Top Post Ad

भैय्यासाहेब इंदीसेेंच्या माध्यमातून डॉ.दिलीप पवार यांनी दिले ठाणे पालिकेला 10 व्हेंटीलेटर्स

 डॉ.दिलीप पवार यांनी दिले ठाणे पालिकेला 10 व्हेंटीलेटर्स, भैय्यासाहेब इंदीसे यांचा पुढाकार


ठाणे 


सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. ज्या रुग्णांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आहे. अशा लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास व्हेंटीलेटर्सची आवश्यकता भासत असते. मात्र, सध्या व्हेंटीलेटर्सचा तुटवडा असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. या करिता रिपाइं एकतावादीचे युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांच्या मध्यस्थीतून ठाणे महानगर पालिकेला कोरोना विशेषज्ज्ञ  सेव्हन हिल्स रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप पवार यांनी 10 व्हेंटीलेटर्स मोफत दिले आहेत. शुक्रवारी ठामपा आयुक्त विपीन शर्मा यांच्या दालनात हा कार्यक्रम संपन्न झाला.


डॉ. पवार हे अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेऊन आले असून आपल्या देशाप्रती असलेल्या आदरभाव आणि प्रेमापोटी मुंबईतील सेव्हन हिल्स, शताब्दी रुग्णालय येथे आपली सेवा देत आहेत. सामाजिक भान राखून त्यांनी कांदिवली येथील दोन्ही कोविड सेंटर्सच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. उत्तर मुंबईत ते नियमितपणे पोलीस दलाचे स्क्रीनिंग आणि पोलिसांवर उपचार करीत आहेत. सायन रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, रेड क्रॉस पुणे यांना डॉ. पवार यांच्या माध्यमातून पीपीई किट तसेच रुग्णवाहिकाही देण्यात आलेल्या आहेत. वाफेच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्याचे संशोधन डॉ. पवार यांनीच केले आहे. त्यांच्या या कामामुळेच त्यांना इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडियन मेडीकल असोशिएशनने कोरोना वॉरियर पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉ. पवार यांनी विनंतीला मान देऊन ठाणे पालिकेेला 10 व्हेंटीलेटर्स दिल्याबद्दल आयुक्त डॉ. विपीन शर्मा, भैय्यासाहेब इंदिसे यांनी आभार मानले आहेत.



 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com