ठाण्यातील कोव्हिड योद्ध्यांना ई गुरुकुलच्या माध्यमातून रस्ते सुरक्षाबाबत प्रशिक्षण
11 हॉस्पिटल्समधील डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णवाहिका चालक व 45 सुरक्षा रक्षकांचा सहभाग
ठाणे
कोव्हिड-१९ या विषाणूजन्य आजाराने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यात भारत सध्या तिसर्या क्रमांकावर असून महाराष्ट्रात तसेच मुंबई ठाणे येथे सर्वात जास्त कोव्हिड रुग्ण आढळले आहेत. या कोव्हिड लढ्यात आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी तसेच पोलीस मोठ्या प्रमाणावर जीवाची बाजी लावत आपली सेवा बजावत आहे. हि सेवा बजावत असताना सुरक्षा म्हणून आव्हानात्मक काळात रस्त्यावरील सुरक्षेचे महत्त्व इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी होंडा मोटरसायकलतर्फे 'होंडा रोड सेफ्टी ई- गुरुकुल डिजिटल रस्ते सुरक्षा जागरूकता' प्रशिक्षण उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत देशभरातील फ्रंटलाइन कोव्हिड योद्ध्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
या उपक्रमाबाबत आयोजक प्रभू नागराज म्हणाले कि, ‘सध्याच्या कठीण परिस्थिती अविरत आणि निःस्वार्थीपणे काम करत असलेल्या देशभरातील फ्रंटलाइन करोना योद्ध्यांना सलाम करत आहे. या सर्वांप्रती आम्ही आपली कृतज्ञता व्यक्त करत असून त्यांना रस्त्यावरील सुरक्षेचे महत्त्वाचे पैलू समजावून देत त्यांच्या सुरक्षेची खात्री करत आहेत. आमच्यासाठी ही केवळ सुरुवात असून हा उपक्रम आम्हाला देशभरातील फ्रंटलाइन कोव्हिड- 19 योद्ध्यांपर्यंत पोहोचवायचा आहे.’ असेही त्यांनी सांगितले या सुरक्षा प्रशिक्षकांनी आतापर्यंत ठाणे, मुंबई आणि येवला, कोईम्बतूर, येथील पोलिस अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णवाहिका चालक आणि सुरक्षा रक्षक अशा 270 फ्रंटलाइन कोव्हिड योद्ध्यांना एक तासाचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले आहे. महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या दोन प्रशिक्षण सत्रांमध्ये मुंबईतील 45 सुरक्षा रक्षक आणि ठाणे व येवल्यातील 11 हॉस्पिटलमधील 30 डॉक्टर्स, नर्सेस व रुग्णवाहिका चालकांना प्रशिक्षित करण्यात आले. त्याचवेळेस चिल्ड्रेन ट्रॅफिक ट्रेनिंग पार्क्समध्ये सुरक्षेच्या सर्व उपाययोजना आणि सुरक्षित अंतरांच्या नियमांचे पालन करत शहरातील 190 पेक्षा जास्त पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
0 टिप्पण्या