कोरोनाची साखळी तोडण्यासाठी डोंबिवलीत कडक लॉकडाऊन

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी डोंबिवलीत कडक लॉकडाऊन



डोंबिवली 


कल्याण डोंबिवली कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र बनत असल्याने यावर क़डक उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनासह पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. यापुढे  कल्याण, डोंबिवली शहरात येणारे गंधारे, दुर्गाडी, पत्रीपूल, शिळफाटा, तळोजा खोणी रस्ता, नेवाळी, तिसगाव, मुरबाड रस्ता, मोहने-टिटवाळा रस्ता, मानपाडा रस्ता, भोपर असे एकूण बारा ठिकाणचे शहरात येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच या नाक्यांवर पोलीस, वाहतूक पोलिसांची चोवीस तास गस्त असल्याची माहिती  कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विवेक  पानसरे यांनी दिली. शहरांतर्गत ५०० पोलीस रस्ते, गल्लीबोळात तैनात केलेत. अत्यावश्यक सेवकांना पहाटेपासून ते १० वाजण्याच्या आत आपली कामे उरकून घ्यावीत, असे विक्रेत्यांना सांगितल्याची माहिती पानसरे यांनी दिली. अनावश्यक वाहने रस्ते काढणाऱ्यांवर दंड आणि वाहन जप्तीची कारवाई केली जाणार आहे, असे उपायुक्तांनी सांगितले.


सकाळपासून चोरून लपून विविध रस्त्यांवर भाजी, फळविक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पालिका पथकांनी हटविले. काहींच्या टोपल्या सामानासह जप्त केल्या. १० प्रभागांमधील पथके कारवाईसाठी सकाळपासून रस्त्यावर उतरली होती. प्रत्येक प्रभागात टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. टाळेबंदीच्या काळात घराबाहेर पडू नका, करोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करा, अशा उद्घोषणा रिक्षामधून पालिका कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत होत्या.


टाळेबंदीत बाहेरील वाहने शहरात येणार नाहीत. शहरांतर्गत सोसायटीमधील एकही रहिवासी रस्त्यावर अनावश्यक बाहेर येणार नाही. या दोन गोष्टींना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने, कर्मचारी वगळता अनावश्यक कोणी बाहेर पडू नये यावर पोलिसांचा भर आहे. बेशिस्तीने वागणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, कल्याण परिमंडळ


टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिलेत. फेरीवाले, विक्रेते दिसणार नाहीत. कोठेही गर्दी होणार नाही याची दक्षता या कालावधीत घेतली जाणार आहे.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1