Trending

6/recent/ticker-posts

 रस्त्याचे काम अर्धवट, ४२ गावांतील हजारो नागरिकांची गैरसोय

 रस्त्याचे काम अर्धवट, ४२ गावांतील हजारो नागरिकांची गैरसोय

 

वासिंद पूर्वेचा अर्धवट राहिलेला रस्ता ठरत आहे चिंतेचे कारण  ;

शेतकऱ्याने घेतली हरकत ;  तीन वर्षांपासून भिजत घोंगडे !

 


 

शहापूर 

 

राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ते वासिंद , शेरे, आंबर्जे  या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत काँक्रीटीकरणाचे काम सुरू होते. परंतु एका शेतकऱ्याने हरकत घेतल्याने हा रस्ता मागील १९ महिन्यांपासून अर्धवट आहे. वासिंद परिसरातील ४२ गावांतील हजारो नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आणि आता पावसाळा झाला तरी या रस्त्याचे काम बंदच असल्याने  खड्ड्यांमुळे एखाद्याचा जीव गेल्यावर अर्धवट रस्ता पूर्ण करणार का ? असा सवाल येथील संतप्त नागरिक करीत आहेत. 

 

वासिंद-शेरे-अंबर्जे हा रस्ता रस्ते विकास आराखडा सन २००१-२१ अनुसार इतर जिल्हा मार्ग दर्जाचा  आहे. रस्त्याच्या दर्जानुसार फॉर्मेशनची रुंदी ७.५ मीटर असते व रस्त्याची हद्द ही १८ मीटर असते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर होणेपूर्वी सदरचा रस्ता डांबरी पृष्ठभागाचा होता. व सदर अस्तित्वातील रस्त्यावरच अस्तित्वातील लांबी, रुंदीमध्ये काँक्रीटीकरणाचे काम सुरू होते. रस्त्याच्या अस्तित्वातील संरेखनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. व वासिंद गावातील आहे त्या रस्त्यावरच  काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने ग्रामस्थाने हरकत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.  असे असताना देखील येथील रहिवासी मंगल बबन जाधव यांनी गावातील सर्व्हे नं. १०५/३ व १०५/४  वर त्यांचा मालकी हक्क दाखविला असून वासिंद पूर्वेचे १०५ मीटर लांबीचे काँक्रीटीकरणाचे काम मागील १९ महिन्यांपासून थांबवले आहे. 

 

वासिंद ही मुख्य बाजारपेठ असल्याने  या रस्त्यावरून वासिंदपरिसरातील शेई, शेरे, अंबर्जे, मढ, हाल, बावघर, मासवणे, आंबिवली तसेच कल्याण ग्रामीण तालुक्यातील वेहळे, काकडपाडा, पळसोळी, गेरसे, कोसले, फळेगांव, उशिद, रुंदे आणि इतर गावपाड्यांतील हजारो नागरिक, विद्यार्थी, महिला, वृद्ध, अपंग रोज जीवघेणा प्रवास करत असतात. 

 

सदर जागा ही वासिंद रेल्वे स्टेशन लगत आहे. त्याचा बाजारभाव जास्त आहे. वासिंद रेडी रॅकनर नुसार सरकारी एन.ए.भावा प्रमाणे ५ पटीने भाव देण्यात यावा. नंतरच रस्त्याचे काम करण्यात यावे. तसेच सदर रस्ता आहे त्या स्थितीत वापरण्यास माझी कोणतीही हरकत नाही. ( मंगल बबन जाधव - हरकतदार शेतकरी,  वासिंद पूर्व)

 

सदर रस्ता पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्यानंतर नियमित पाच वर्षे देखभाल दुरुस्ती अंतर्गत  दुरुस्तीकरून राहदरीसाठी योग्य करण्यात येईल.  (यु. बी. निकम- उप-अभियंता प्रधान मंत्री ग्राम सडक योजना, उपविभाग ठाणे)

 

 

Post a Comment

0 Comments