सरस्वती गमरे यांचे दुःखद निधन
मुंबई
बौध्दजन सहकारी संघ (रजि) शाखा क्र. २४ मुंढर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी या शाखेचे उपचिटनिस अरुण गुणाजी गमरे यांच्या मातोश्री दिवंगत सरस्वती गमरे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतच दुःखद निधन झाले, अतिशय मनमिळाऊ, प्रेमळ व सर्वसमावेशक अश्या सरस्वती गमरे यांच्या अकस्मात निधनाने सर्वच शाखा पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ यांच्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे त्यांचा मुलगा, नातू, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे.
अरुण गमरे यांच्यावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगात शाखा क्र. २४ गाव मुंढर, मुंबई शाखा, दोन्ही शाखांचे पदाधिकारी, सभासद व सर्व मुंढर ग्रामस्थ व नातेवाईक सहभागी आहेत तसेच कोरोना व्हायरस कोव्हिड १९ या वैश्विक महामारीचे भान ठेवून दिवंगत सरस्वती गमरे यांच्या शोकसभेचा कार्यक्रम नायगाव येथील त्यांच्या राहत्या घरी शासकीय नियम व सोशल डिस्टसिंग चे पालन करत अत्यंत साध्या पद्धतीने रविवार दि. ७ जून २०२० रोजी आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती शाखेने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात शाखेचे सरचिटणीस अनिल जाधव यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या