अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अंध, अपंगांचे हाल थांबवा, सर्व रेल्वे स्थानकावर लोकलला थांबा आवश्यक
ठाणे :
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याकरिता रेल्वेने लोकल सेवा सुरू केली. पण ही लोकल जलद थांबे ज्या स्थानकावर आहे, त्याच स्थानकावर थांबत आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी तसेच अंध, अपंग कर्मचारी यांना ज्या स्थानकावर उतरायचे आहे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील सुरू असलेल्या सर्व स्थानकावर लोकलला थांबा द्या अशी मागणी रेल्वे सल्लागार समिती माजी सदस्य अमोल कदम यांनी केली आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेवर जाण्यासाठी रेल्वेने लोकल सेवा सुरू केली. पण सद्य स्थितीत ह्या लोकल जलद थांबा ज्या स्थानकात आहे त्याच स्थानकावर थांबत असून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अंध, अपंग कर्मचारी देखील आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांना तसेच सर्व अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचार्यांना प्रचंड त्रास सहन करून घरातून रेल्वे स्थानक तसेच रेल्वे स्थानकातुन घर गाठावे लागत आहे. स्थानक परिसरात येण्याकरिता खाजगी वाहन देखील वेळीच मिळत नसल्याने स्थानकावर येताना आणि जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता सुरू केलेल्या लोकलला सर्व रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी रेल्वे सल्लागार समिती माजी सदस्य अमोल कदम यांनी रेल्वेकडे केली आहे.
0 टिप्पण्या