पेट्रोल-डीझेल दरवाढी विरोधात २९ जून रोजी काँग्रेसचे धरणे आंदोलन
ठाणे
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील भा-ज-पा सरकारने घेतलेल्या पेट्रोल-डीझेल दरवाढी विरोधात ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवार २९ जून रोजी सकाळी 10 ते 12 या वेळात शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय परिसर, स्टेशन रोड,ठाणे येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या अन्यायकारक पेट्रोल व डीझेलच्या दरवाढी विरोधातील या धरणे आंदोलनात सर्व काँग्रेसचे जेष्ठ मान्यवर,प्रदेश पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, नगरसेवक, माजी नगरसेवक, शहर काँग्रेस पदाधिकारी,विविध विभाग अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत सूरू असलेल्या कोरोना संसर्गच्या पाश्वभुमि आपण सर्वांनी काळजी घेउनच कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवूनच कार्यक्रमात राहायचे आहे, आवश्यक त्या सूचनाचे काटेकोरपणे पालण करावयाचे आहे,मास्क शिवाय कोणालाही सहभागी होता येणार नाही आपली सर्वाची थर्मोल तपासणी करूनच कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे कृपया कोणीही याबाबत कोणतीही तक्रार करू नये ज्यांना कमी अधिक प्रमाणात सर्दी,खोकला,ताप आदि लक्षणे असतील त्यांनी नाही आले तरि चालणार आहे त्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या