Top Post Ad

फेसबुक व यूट्यूबच्या माध्यमातून ब्रह्मांड कट्टयावर "चारचौघी" कार्यक्रम संपन्न




फेसबुक व यूट्यूबच्या माध्यमातून ब्रह्मांड कट्टयावर "चारचौघी" कार्यक्रम संपन्न

 

ठाणे :

 

 जून महिन्याचा कट्टा रविवार दिनांक १४ जून २०२० रोजी सांयकाळी ६ वाजता "चारचौघी" संपन्न झाला.  ब्रह्मांड कट्टयाच्या वतीने आयोजक राजेश जाधव यांनी प्रथम नुकतच निधन झालेला गुणी कलाकार सुशांत सिंह राजपूत यांस श्रध्दांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. सौ. मनिषा ठाणेकर हीने 'अधिर मन झाले' हे पावसाच्या वातावरणाला साजेसे सुंदर गाणे गाऊन रसिकांची मने सुरांनी चिंब केली. त्यानंतर सौ मनिषा ठाणेकर यांची  मुलगी अक्षदा ठाणेकर हीने आई सोबत अनप्लग हा अनोखा गीतांच्या स्वरुपात सादर केला. जुन्या व नविन हिंदी गाण्याची सुरावट या मायलेकींनी लिलया सादर केली रसिक प्रेक्षक खरंच सूरांच्या  सरींवर देहभान विसरून ऑनलाईन मजा  घेतली . व रसिकाकडून  भरघोसा अशा लाईकस् व कमेन्टस मिळविल्या. 

 

त्यानंतर मराठी नाटक,  प्रायोगिक रंगभूमी,  सिनेमा, दूरदर्शन मालिकेत गेली 12 वर्ष काम करणाऱ्या अभिनेत्री सौ. स्नेहा रायकर यांची मुलाखत ब्रह्मांड कट्टयाच्या सचिव सौ स्नेहल जोशी यांनी घेतली. मुलाखतीत सर्व सामान्य रसिकांच्या मनात नेहमीच सिने, नाटक सृष्टीतील कलाकारांबाबत नेहमीच उत्सुकता असते.  त्यांच्या मनातील हितगुज  आत्ताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमी वर अचानक लाभलेल्या सुट्टीत कलाकार काय करतात? असे रसिकाच्या मनात असलेले प्रश्न, तसेच  कलाकराना अभिनय क्षेत्रात करावे लागणारे कष्ट  व नतंर मिळणारे यश यामधील प्रवासाचे अंतरंग  व या क्षेत्रातील अनुभव याबाबत सौ.स्नेहा रायकर या अभिनेत्री कडून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 


 

  सामाजिक व शासनाचे नियम पाळून आपल्याच सोसायटीत रहात असलेले  कलाकार घेऊन कार्यक्रम करण्याचे ठरले. सद्य परिस्थितित ब्रह्मांड कट्टयाने फेसबुक व यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कार्यक्रम करण्याचे योजिले आहे.  त्या प्रमाणे मे महिन्याचा कट्टा अभिवाचनाच्या स्वरुपात सादर करण्यात आला.  त्या कार्यक्रमाला लाईक व सब्सक्राइब करुन प्रेक्षकांनी भरघोर प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार संस्थापक राजेश जाधव तर पाहुण्याचे स्वागत अध्यक्ष महेश जोशी यांनी केले.



 


 



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com