Trending

6/recent/ticker-posts

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जि.प. पिसेपाडा शाळेत  वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जि.प. पिसेपाडा शाळेत  वृक्षारोपण

 

भिवंडी

तालुक्यातील पिसे केंद्रातील पिसेपाडा जिल्हा परिषद शाळेत संतोष  जोशी  यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात विविध प्रकारची झाडे  झाडे लावून पर्यावरण वाचवा असा सामाजिक संदेश दिला आहे. यावेळी पिसेपाडा शाळेच्या परिसरात   गुलमोहर, लिली, आकेश, टगर,झेंडू  वडाचे  झाड लावले आहेत. गेल्या वर्षभरात शिक्षक संतोष जोशी  यांनी  असंख्य रोपे लावली असून . बी, बियाणे ते  ग्रामस्थांना वृक्ष लागवड करण्यास मदत करतात. या उपक्रमामुळे केंद्रप्रमुख  शामसुंदर दोंदे व  मुख्याध्यापिका शुंभागी सांवत यांच्या कडून  यावेळी पिसे केद्रातील  शिक्षक संतोष  जोशी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. 

 


 

 कल्याण मधील टीम परिवर्तनच्या युवकांनी आंघोळीची गोळी संस्थेमार्फत झाडांप्रती बांधिलकी जपत कल्याण शहरातील प्रेम ऑटो ते शिवाजी चौक या परिसरातील झाडांवरील खिळे व पोस्टर काढले. तसेच नुकतेच  होऊन गेलेल्या वटपौर्णिमेला महिलांनी जिथे जिथे धागे वडाच्या झाडांना गुंडाळले  होते. असे  २५ मीटर लांबीचे धागे ह्या युवकांनी वडाच्या झाडांपासून काढले व झाडांना धागे मुक्त केले आहे.  कल्याण मधील परिवर्तन टीमच्या युवकांनी आंघोळीची गोळी संस्थेमार्फत  पर्यावरण संवर्धनासाठी  स्तुत्य उपक्रम  राबवून  समाजात एक सामाजिक दिला आहे. 

 

आमचा कुणाच्या संस्कृती व परंपरेला विरोध नाही परंतु संस्कृतीच्या नावाखाली पर्यावरणचं नुकसान होऊ नये यासाठी कुणी फांद्या तोडू नये, झाडांना खिळे पोस्टर मारू नये. तसेच ज्या प्रमाणे लॉकडाऊन मध्ये आपण घरात चार भिंतीत बसून कैद आहोत.  तेव्हा आपल्याला जस बंधनात असल्याची जाणीव होते. त्याचप्रमाणे धागे गुंडाळून त्या खाली जळते कापूर, दिवे, अगरबत्ती ठेवून झाडांनाही बंधनात असल्याची जाणीव होत असेल, त्यांना ही चटके लागत असतील. वेदना होत असतील फक्त ते बोलु शकत नाहीत.  म्हणून त्यांच्या वेदनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आपल्या परंपरा व संस्कृती निसर्गाला धरून जोपासायला हव्यात कारण कळत नकळतपणे आपण निसर्गाला हानी पोहोचवत राहीलो तर आपली येणारी पिढी धोक्यात जाऊ शकते ह्यात शंका नाही असे  स्वप्निल शिरसाठ यांनी बोलताना सांगितले. 

 

अंघोळीची गोळी ह्या संस्थे मार्फत पर्यावरण संवर्धनासाठी हे युवक विविध भागात काम करत असून झाडांचे विद्रुपीकरण करणे, त्यांना हानी पोहोचवणे कायद्याने गुन्हा आहे. आणि त्यासाठी जनजागृती करण्याचे काम आपल्या शाहिरी गीतांच्या माध्यमातून स्वप्निल शिरसाठ करत असतात. सदर प्रेम ऑटो आणि बिर्ला कॉलेज परिसरातील जवळपास २५ मीटर लांबीचे धागे ह्या युवकांनी वडाच्या झाडांपासून काढले व झाडांना धागे मुक्त केले आहे. सदर  उपक्रमात  भूषण राजेशिर्के, अविनाश पाटील व स्वप्निल शिरसाठ हे तरुण  सहभागी झाले होते.


 

  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या