ठाणे शहरात घरोघरी ताप तपासणी करण्यावर भर
प्रत्येक प्रभाग समितीमध्ये विशेष पथकाद्वारे, शिबीरांच्या माध्यमातून तपासणी
ठाणे
ठाणे शहरामध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने अनेक परिसर कोन्टोनमेंट झोन करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना युद्धपातळीवर सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक प्रभाग समितीमध्ये विशेष पथकांच्या माध्यमातून तसेच आरोग्य शिबीराच्या माध्यमातून ताप तपासणी करण्यावर भर देण्यात येत आहे. या तपासणीमध्ये काही व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना तातडीने महापालिका क्वारंटाईन सेंटर्समध्ये स्थलातंरित करण्याच्या सूचना महापालिका महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या आहेत.
नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतंर्गत खारटन रोड येथील बीएसयुपीच्या एक ते सहा इमारतींमध्ये घरोघरी जावून ताप तपासणी करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर विष्णूनगर, घंटाळीदेवी मैदान याठिकाणी ताप तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेवक संजय भोईर, परिमंडळ उप आयुक्त संदीप माळवी, नौपाडा-कोपरीचे समन्वय अधिकारी उप आयुक्त विश्वनाथ केळकर आणि सहा. आयुक्त प्रणाली घोंगे आदी उपस्थित होते.
लोकमान्यनगर येथे प्रभाग क्रमांक 6 मध्येही मोबाईल व्हॅन क्लिनीकच्या माध्यमातून ताप तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे, परिमंडळ उप आयुक्त अशोक बुरपल्ले, सहा. आयुक्त नयन ससाणे तर कळवा प्रभाग समितीतंर्गत सूर्यनगर आणि विटावा गाव येथेही ताप तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप आयुक्त मनीष जोशी, सहा. आयुक्त सचिन बोरसे उपस्थित होते.
वर्तकनगर प्रभाग समितीतंर्गत शिवाईनगर, म्हाडा कॅालनी आणि धर्मवीरनगर येथेही ताप तपासणी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक नगरसेवक सौ. परिषा सरनाईक, सौ. जयश्री डेव्हीड, सौ. स्नेहा आंब्रे, सहा. आयुक्त डॅा. चारूशीला पंडीत आदी उपस्थित होते तर उथळसर प्रभाग समितीमध्ये सिद्धेश्वर तलाव, गोकुळ नगर, राबोडी, पंचगंगा, साईनाथनगर आणि पाचपाखाडी या ठिकाणी ताप शिबीर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहा. आयुक्त शंकर पाटोळे उपस्थित होते.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीतंर्गत साईनाथ नगर, शिवाजी नगर, पातलीपाडा, ढोकाळी गाव या ठिकाणी घरोघरी जावून ताप तपासणी करण्यात आली त्याचबरोबर या चारही ठिकाणी ताप तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक नगरसेवक संजय भोईर, परिमंडळ उप आयुक्त अशोक बुरपल्ले, सहा. आयुक्त डॅा. अनुराधा बाबर आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या