Trending

6/recent/ticker-posts

इंडियन रेड क्रॉस सोसायटीची कमिटी निलंबित करण्याची मागणी 


इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे रुग्णालय पालिकेने तात्काळ ताब्यात घ्यावे  

- मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव 

 

ठाणे


करोना महामारीच्या काळात ठाण्यातील इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे रुग्णालय बंद असल्याने नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे रुग्णालय तत्काळ सुरू करावे, अन्यथा जिल्हा किंवा महापालिका प्रशासनाने हे रुग्णालय ताब्यात घेऊन ते कार्यान्वित करण्याची मागणी शहरात केली जात आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले व गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे रुग्णालय पालिकेने ताब्यात घ्यावे अशी सूचना  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे तिन पेट्रोल पंप जवळ रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची मोफत अथवा अल्पदरात रुग्ण सेवा केली जाते. दंतचिकित्सा, आयसीयु, तसेच विविध आजारांवर येथे उपचार केले जातात. विविध विभाग येथे आहेत. मात्र हे रुग्णालय गेले काही दिवस बंद आहे. आज कोरोनाचा कहर पाहता रुग्णालये कमी पडत आहेत. तर सर्वसाधारण आजारांसाठी रुग्णालयांची दारे बंद आहेत. पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने हे रुग्णालय सुरु करावे जेणे करुन सर्वसामान्य नागरिकांना उपचारांची सुविधा उपलब्ध होऊ शकते अशी मागणी अविनाश जाधव यांनी पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या कडे केली आहे. 

इंडियन रेड क्रॉस सोसायटी ही रुग्ण सेवेसाठी तत्पर असते. मात्र कोरोनासारख्या महामारित सोसायटीचे डॉक्टर अदृश्य झाले आहेत. याला एकमेव कारण म्हणजे इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या कमिटीवर भारतीय जनता पार्टीच्या आमदार आणि नगरसेवक आणि हितसंबंधियांचा भरणा आहे. हे सदस्य निक्रीय आहेत. अशा सदस्यांची कमिटी तात्काळ निलंबित करावी आणि पालिकेने संस्था ताब्यात घ्यावी अशी सूचना अविनाश जाधव यांनी केली आहे. पालिका आयुक्तांनी येत्या चार दिवसात रुग्णालयाचा ताबा घेण्याचे आश्वासन दिले आहे. पालिकेने जर हे रुग्णालय ताब्यात घेतले नाही तर मनसे हे रुग्णालाय ताब्यात घेऊन रुग्णसेवा सुरु करील असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. 

  

Post a Comment

0 Comments