Trending

6/recent/ticker-posts

कटिंग-दाढीचे बारा आणे, पण बाबासाहेबांनी मला दहा रुपयांची नोट दिली - बाबुअण्णा

कटिंग-दाढीचे बारा आणे, पण बाबासाहेबांनी मला दहा रुपयांची नोट दिली - बाबुअण्णा


बाबासाहेबांची 'सोल्जर कट' करणारे हात अनंतात विलीन 


औरंगाबाद


'भारतीय संविधानाची निर्मिती करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे केस कापताना आपले हात थरथरत होते,' अशी आठवण सांगणाऱ्या गवळीपुऱ्यातील (छावणी) बाबृअण्णा गारोल यांचे सोमवारी (३ जून) वृद्धापकाळाने निधन झाले. छावणीतील नऊ नंबरच्या डाकबंगल्यात गारोल यांनी बाबासाहेबांची 'सोल्जर कट' करून दिली होती. १९५२ ची ही घटना होती, त्या वेळी फका 'बारा आणे' कटिंगचा रेट असताना बाबासाहेबांनी त्यांना दहा रुपये दिले होते. हॉकीपटु म्हणन प्रसिद्ध असलेले बाबुअण्णा यांनी ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.


मिलिंद महाविद्यालयाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी बाबासाहेब नेहमी औरंगाबादेत येत होते. छावणीच्या डाक बंगल्यात राहत होते. त्यांनी एकदा रुजाजी भारसाखळे यांच्याकडे शेव्हिंग आणि कटिंग करण्याची इच्छा व्यक्त केली. १९५२ दरम्यानची ही आठवण आहे. रुंजाजी भारसाखळे छावणीतील बाबूअण्णा गारोल यांच्याकडे घेऊन गेले.


गारोल यांनी त्यानंतर राज हेअर कटिंग सलून सुरू केले होते. सलूनमध्ये ते बाबासाहेबांची नेहमी आठवण सांगत असत.


त्यांनी सांगितलेली आठवण त्यांच्याच शब्दांत.... त्या वेळी बाबासाहेबांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोघानी आधार देऊन माझ्यासमोरील खुर्चावर बसवले. त्यांनी माझ्याकडे बघून म्हटले की, सोल्जर कट करून दे. त्यानंतर मी कैची आणि कंगवा हातात घेऊन उभा राहिलो तर माझे हात थरथरत होते. त्या वेळी माझे वय २५ वर्षांचे होते, पण बाबासाहेबांनी देशाचे संविधान लिहिले आहे. त्यांनी देशाचे मंत्रिपद भूषवले आहे, याची कल्पना होती. त्यामुळे त्यांना स्पर्श करून त्यांचे केस कापण्यासाठी माझे हात थरथरत होते. पण तरीही मोठी हिंमत करून त्यांची सोल्जर कट करून दिली. पण मी बाबासाहेबांच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत होतो. त्यांनी आरशामध्ये पाहिल्यानंतर म्हटले, 'अरे चांगली केली सोल्जर कट.' त्या वेळी माझ्या जिवात जीव आला.


१९५२ दरम्यान आम्ही कटिंग-दाढीचे बारा आणे घेत होतो, पण बाबासाहेबांनी मला दहा रुपयांची नोट दिली होतो. ती मी कधीही खर्च केली नाही. प्रत्येक आबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाला अशी आठवण सांगणारे गारोल आता पंचत्वात विलीन झाले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या