कोरोना, लॉकडाऊन आणि प्रज्ञा प्रतिष्ठानचे अनमोल कार्य
मुंबई
कोरोना महामारीच्या प्रभावाने संपुर्ण देश व्यथित झाला आहे. सुमारे अडीच महिन्याचा लॉकडाऊनचा काळ म्हणजे सर्व सामान्य नागरीकांच्या मनस्ताप आणि प्रचंड अडचणीचा काळ ठरला. अद्यापही तीच परिस्थिती आहे. मात्र काही प्रमाणात त्यातून सुटका होण्यास सुरुवात झाली आहे. आजही दिवसागणिक रुग्णांची वाढ होत आहे. हे सगळं कधी थांबेल आणि पुन्हा जनजीवन कधी सुरळीत होईल याचा काही नेम नाही. गृहनिर्माण संकुलातून घराचे दरवाजे बंद करून बंद घरात सर्व सुखसोयींनी युक्त असलेल्यांना याचा प्रभाव अधिक जाणवला नाही. मात्र झोपडपट्टीत राहणाऱया रोजंदारीवर काम करणाऱया मजूर, कंत्राटी कामगार वर्गाचे जगणे या लॉकडाऊन काळात असह्य झाले. रोजच्या कमाईवर ज्यांचे जीवन अवलंबून होते. त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले. दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. घरात काही नाही, पण घराबाहेर पडू शकत नाही अशा अवस्थेत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. अशा विवंचनेत झोपडपट्टीतील नागरीक कसेबसे दिवस काढत असतानाच मुंबईतील प्रज्ञा प्रतिष्ठानने या लोकांना मदतीचा हात दिला.
कोरोनाचे माहेरघर झालेल्या धारावीतील झोपडपट्टी भागात प्रज्ञा प्रतिष्ठान आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अन्नधान्य वाटप, तसेच जेवण वाटपाची जोरदार मोहीम राबवली. ओ.एन.जी.सी.च्या aत्त् ग्ह्ग्aह sम्,st wात्aिrा asदम्ग्atग्दह मुबंई कर्मचारी संघटनेच्या विशेष सहकार्याने ही मदतकार्याची मोहीम लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच लोकांना संजीवनी ठरली. अचानक सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र प्रज्ञा प्रतिष्ठानच्या या कार्यामुळे या लोकांच्या घरात अन्नधान्य गेलं.
धारावीसारख्या परिसरात मागील दहा वर्षापासून वेगवेगळ्या कार्यांनी आपला सामाजिक ठसा उमटवणाऱया या संस्थेने कोरोना संकटात लोकांना केलेली मदत ही अप्रतिमच म्हणावी लागेल. दरवर्षी शालेय मुलांना वह्यावाटप, अगदी दिवाळीच्या सणाला पणत्या, उटणांचे वाटप अशी सामाजिक कामे सुरुच असतात. कोरोनाच्या या संकट काळात हातावर पोट असलेल्या हजारो श्रमिक बांधवांसाठी शिधा वाटप तसेच जेवणाची पाकिटे वाटप करण्याचे उद्धीष्ठ डोळ्यासमोर ठेवले. प्रत्येक कुटुंबाला तांदूळ, गहू, गोडेतेल, साखर, मीठ-मिरचीपावडर असे जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. धारावी मधील राजीव गांधी नगर, माहीम फाटक, बनवारीलाल कम्पांऊड, मुकुंद नगर, शास्त्राr नगर, पंचशिल नगर, या शिवाय त्याही पुढे जाऊन सायन हॉस्पीटलजवळचा परिसर, सायन ब्रिजच्या बाजूला असलेली वसाहत, प्रतिक्षा नगर, सांताक्रुझ कदम वाडी, विलेपार्ले, जेतवण बोध्द विहाराजवळ झोपडपट्टी, तसेच नवी मुंबईतील नेरुळ वाशी येथे असलेल्या काही बांधवांपर्यंतही ही मदत पोहोचवण्यात आली.
केवळ अन्नधान्याची मदत देऊन संस्था थांबली नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी, शारिरीक क्षमतेत वाढ होण्यासाठी, धारावी पुर्नविकास समितीच्या प्रयत्नाने व आयुष्य हॉस्पीटलच्या सहकार्याने कोरोनाग्रस्त रुग्णांना तसेच कोरोनाग्रस्त रुग्णाची सेवा करणाऱया कर्मचारी वर्गाला (Arाsाहग्म्ल्स् aत्ंल्स् 30) आयुर्वैदिक औषधाच्या गोळ्याचे वाटपही करण्यात आले. आयुष्य हॉस्पीटलचे डॉ. सुहास देसाई, डॉ.तहल मँडम यांच्या विशेष सहकार्याने संस्थेने राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, राजे शिवाजी विद्यालय, म्युनिसिपल ट्रान्झीस्ट कॅम्प, आदी ठिकाणी प्रभाग समितीचे अध्यक्ष नगरसेवक वसंत नकाशे, समाजसेवक संदिप कवडे, संजिवन जैयस्वाल यांच्या उपस्थितीत हे कार्य केले. शिवाय धारावी पुर्नविकास समितीच्या माध्यामातुन प्रत्येक विभागात जंतुनाशक फवारणी देखील करण्याचे मोलाचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिवराम कासारे आणि त्यांच्यासोबत नेहमीच प्रत्येक कामात पुढाकार घेणारे संस्थेचे खजिनदार नितीन पोपट दिवेकर, संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा गौतमी सुनिल जाधव यांची प्रचंड मेहनत आणि सामाजिक बांधिलकी यामुळेच धारावीतील नागरिक संस्थेच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.
धारावी झोपडपट्टी परिसर असल्याने मोठ मोठ्या एन.जी.ओ.ची मदत या परिसरात पोहोचायला उशीर झाला. मात्र आम्ही इथले स्थानिक असल्याने या परिसरातील गल्लोगल्या आणि तिथे राहणारी कुटुंबे त्याचे हाल आम्ही पाहिले. याबाबत ओ.एन.जी.सी.चे अनिलकुमार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. ऑल इंडिया एससी व एसटी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन, ओएनजीसी,मुंबईचे सभासदांच्या वतीने मुंबईचे योगेश सोमकुंवर याच्या सहकार्याने आम्ही मदत कार्य सुरु केले. या कामी धारावी पोलिस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले - अनिल शिवराम कासारे
0 टिप्पण्या