मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग

तलासरी तालुक्यात मार्गदर्शन शिबीर; नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचा पुढाकार*


तलासरी


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला असून प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनतर्फे (एनएचएसआरसीएल) तलासरी तालुक्यातील जरी गावात नुकतेच प्रकल्प लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लागणा-या जमिनीच्या संपादनाच्या प्रक्रियेबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट होते. प्रकल्पात ज्यांच्या जमिनींचे संपादन केले जाणार आहे त्या भूधारकांना सर्व व्यवहार सुलभ व्हावेत यासाठी कागदपत्रांच्या व्यवहारासाठी वकील उपलब्ध करून देणे, नोटरी, स्टॅम्प पेपर, टायपिस्ट, झेरॉक्स तसेच प्रिंटर इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मार्गदर्शन शिबिरादरम्यान सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.  
 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या