वारंवार वीज खंडीत बील मात्र वाढीव, टोरंटोकडून नागरिकांची लूट - भगत
ठाणे
कळवा मुंब्रा दिवा शिळ दहिसर विभागातील नागरिकांनी आपल्या विभागात टोरंट कंपनीचे कामगार व अधिकारी आपल्या विभागात महावितरणनी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधां नष्ठ करुन नवीन केबलसह अनेक सिस्टीम बदलुन विजग्राहकांना भिवंडी सारखे त्रास देण्याची तयारी सुरू केलेली आहे. त्यात वारंवार विजपुरवठा खंडीत करुन ग्राहकानी त्यांच्या कामाची दखल घ्यावी व त्यांच्या कार्यालयाचे यावे म्ह्णुन हा त्यांचा खटाटोप असल्याचा आरोप होत आहे. तसेच भिवंडी, कळवा, मुंब्रा, दिवा आणि शीळ डायघर भागात वीज देयक आणि वसूलीचे काम टोरेंट कंपनीकडून करण्यात येत आहे. या कंपनीकडून गेल्या दोन महिन्यांपासून ग्राहकांना २० टक्के वाढीव वीजदेयके पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे दर महिन्याला सुमारे १५० ते २०० युनिटचा वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना थेट ६०० हून अधिक युनिटचे वीज देयक पाठविण्यात येत आहे. अनेकांना १० हजारहून अधिकची वीज देयके आलेली आहेत.
टाळेबंदी लागू असल्याने घरातील उत्पन्नाची साधने मर्यादित झाली आहेत. त्यातच ही वाढीव वीज देयके पाठविण्यात येत असल्याने अनेकांनी वीज देयक भरणार नसल्याचे ठरविलेले आहे. व्यावसायिक दुकाने बंद असताना त्यांनाही वीज देयक पाठविण्यात येत आहे. अशा तऱ्हेने टोरंटो कंपनीने लूटण्याचा प्रकार सुरु केला असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. याबाबत टोरेंट कंपनीला संपर्क साधल्यास त्यांच्याकडून उत्तरे मिळत नसल्याचा आरोप येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे टोरेंट कंपनीला हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. टोरेंट कंपनीकडून नागरिकांची लूट सुरू आहे.त्यासाठी कृपया कोणीही टोरंट चे ऑनलाइन किंव्हा विज भरणा केंद्रावर जाऊन बिल भरु नयेत.तसेच त्यांचे मीटर ही घेऊ नयेत.असे असह्कार आंदोलन सुरू करावे.त्याने सरकार ही ठिकाण्यावर येईल. आज टोरंटच्या खंडीत विजपुरवठ्यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, शिळ, देसई, दहिसर विभागातील जनता हैरान झाली आहे. म्ह्णुन त्यानी एकत्रित येवुन टोरंट विरोधी लॉकडाऊन मध्ये सुरु होणारया आंदोलनास पाठींबा देऊन टोरंट विरोधी आपला आवाज बुलंद करावा. या लुटीचा सर्व शक्तीनिशी विरोध करण्याचे आवाहन टोरंट हटाव मोहिमेचे प्रमुख गोविंद भगत यांनी केले आहे.
0 टिप्पण्या