Trending

6/recent/ticker-posts

जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या वतीने  शोक व आक्रोश प्रदर्शन

जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या वतीने  शोक व आक्रोश प्रदर्शन

 

ठाणे

 


 

जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या वतीने १ जून रोजी देशभरात कष्टकरी, मजूर व शेतकरी यांच्या अधिकारांबाबत संवेदना व्यक्त करण्यासाठी ठिकठिकाणी " शोक व आक्रोश प्रदर्शन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात आक्रोश प्रदर्शन करत याबाबत ठाणे जिल्हाधिकारी यांना एक मागणी पत्र देण्यात आले. जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे ठाणे शहरातील समन्वयक अजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ संजय मंगला गोपाळ,  जगदीश खैरालिया, उमाकांत पावसकर, सुनील दिवेकर, प्रविण खैरालिया, अंकुश चिंडालिया आणि आतिश राठोड आदि प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 


• प्रत्येक नागरिकाचा अन्नअधिकार – प्रतिव्यक्ती दरमहा 15 किलो धान्य, डाळी, तेलासह. 

• प्रत्येक बेरोजगार कष्टकऱ्यासाठी प्रत्येक राज्यात 15 जूनपर्यंत मोफत वाहनव्यवस्था.

• न्यायालयाच्या आदेशानुसार स्थलांतरित मजुरांना 17 मे पर्यंतचे पूर्ण वेतन.

• सर्व स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावा/घरापर्यंत मोफत रेल्वे वा बस व्यवस्था.

• सर्वोच्च न्यायालयाच्या 28.5.2020 च्या आदेशांचे राज्य व केंद्र सरकारांकडून पालन.

• श्रम कायद्यांचे पूर्णपणे पालन. कुठलाही श्रम कायदा रद्द करण्यास विरोध.

• आयकर दाते वगळता प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 10000 रुपये जमा.

• लॉकडाऊनमुळे नाइलाजाने आपल्या मूळ गावी परतताना मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची नुकसानभरपाई.

• प्रत्येक गावा, वस्ती, शहरांमध्ये स्थानिक रोजगार निर्माण करा. रोजगार हमी योजना राबवा. प्रत्येक हाताला काम द्या. कष्टकऱ्यांवर वणवण भटकण्याची वेळ आणू नका. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्याचे संयोजक अजय भोसले यांनी सांगितले असल्याची माहिती जगदीश खैरालिया, ठाणे जिल्हा समन्वयक. सेक्रेटरी, श्रमिक जनता संघ यांनी दिली. 

 

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या