मुख्य स्मशानभूमीच्या धुरामुळे परिसरातील नागरिक भयभीत
ठाणे
खारटण रोड परिसरातील नागरिकांना या धूर व त्यातील दुर्गंधी मुळे अतिशय त्रासामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. कृपया या बाबतीत उपाय योजना करावी. असे पत्र नौपाडा कोपरी प्रभागाचे उप आयुक्त संदीप माळवी यांना पाठवण्यात आले. शिवाय याबाबत वारंवार विचारणाही करण्यात येत आहे. मात्र ठाणे महानगरपालिका प्रशासनाने या तक्रारीवर कोणतीही दखल घेत नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
जवाहर बाग परिसरातील या स्मशानभूमीत कोरोना संक्रमित प्रेते जाळण्याची संख्या वाढली आहे. त्यातील धुरामुळे खारटण रोड व आसपासच्या परिसरात देखील कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढत आहे. तसेच या स्मशान भूमीत काम करणारे दोन कामगार व त्यांच्या कुटुंबातील लोक देखील कोरोना संक्रमित झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. आज १५ जुन रोजी सुमारे दिवसभर या स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात धुर निघून संपूर्ण परिसरात प्रदूषण वाढत होते. मात्र प्रशासनाला याबाबत काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत असून याबाबत लवकरच जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
0 टिप्पण्या