अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात ठाणे काँग्रेसचे धरणे आंदोलन
ठाणे:
संपूर्ण देशात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे जनता हैराण झाली असतांना आता मागील काही दिवसात पेट्रोल आणि डिङोलचे दर गगणाला भिडू लागले आहेत.त्यामुळे वाढत्या अन्यायकारक दरांबाबत शहर कॉंग्रेसच्या वतीने येत्या सोमवारी म्हणजेच 29 जुन रोजी केंद्र सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन केले जाणार आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत हे आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शहर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे यांनी दिली. गलवाना खोऱ्यात चीनच्या हल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्यातील सैनिकांना शुक्रवारी ठाणे शहर कॉंग्रेसच्या वतीने आज २६ जुन रोजी ठाण्यातील तलावपाळी येथील उद्यानातील महात्मा गाधी यांच्या पुतळ्यासमोर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी चीनी सैन्याने हडपलेली जमीन परत घ्यावी अशी मागणी देखील करण्यात आली.विशेष म्हणजे कॉंग्रेस कमिटीतर्फे राज्यभर आजचा दिवस शहींदो को सलाम दिवस म्हणून पाळला गेला. ठाणे शहर काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळी सहभागी झाली होती.यावेळी चीनी सैन्याशी लढा देतांना गलवान खो-यात भारतीय जवान शहीद झाले.तसेच चीनी सैन्याने येथील जमीनही हडपली आहे.त्यामुळे ही जमीन परत घ्यावी,चीनला जशाच तसे उत्तर द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.यावेळी अतिशय शांतपणो सर्व पदाधिकाऱ्यांनी शहीद जवानांना मानवंदना दिली.भारतीय सैन्यदल अतिशय ताकदवान आहे,ते चीन सैन्याला जशाच तसे उत्तर देऊ शकतात. परंतु केंद्र सरकारकडून त्यांना पाठबळ मिळणे अपेक्षित असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
0 टिप्पण्या