Trending

6/recent/ticker-posts

पालिकेने सध्‍या ऑक्‍सीजन व आयसीयु बेड वर फोकस करावा-  पालकमंत्री

महापालिकेने सध्‍या ऑक्‍सीजन बेड व आयसीयु बेड वर फोकस करावा,


आवश्‍यकता लागल्‍यास अधिक निधी उपलब्‍ध करून देईन!


 पालकमंञी एकनाथजी शिंदे.!!


कल्याण  


कडोमपा क्षेञातील वाढती रूग्‍ण संख्‍या पाहता महानगरपालिकेने आयसीयु बेड व ऑक्‍सीजन बेडस वर फोकस करावा, व्‍हेटिंलेटर्स विकत घ्‍यावेत. आवश्‍यकता लागल्‍यास अधिक निधी उपलब्‍ध करून देईन, असे आश्‍वासन पालकमंञी एकनाथजी शिंदे यांनी आज दिले. महापालिका क्षेञातील वाढत्‍या रूग्‍ण संख्‍येवर प्रतिबंध घालण्‍याच्‍या दृष्टिने सर्वमताने चर्चा करण्‍यासाठी महापालिकेच्‍या आचार्य अञे , नाटयगृहातील कॉन्‍फरन्‍स हॅाल मध्‍ये आयोजिलेल्‍या बैठकीत त्‍यांनी हे आश्‍वासन दिले. महापालिकेने सदयाच्‍या परिस्थितीत बेडची संख्‍या वाढविणे तसेच कॉन्‍टॅक ट्रेसिंग ही वाढविणे गरजेचे आहे, असेही मत त्‍यांनी यावेळेस मांडले.
सदर बैठकीत प्रथमतः महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेची कोव्हिड ची सद्यस्थिती व त्‍यासाठी महापालिका करीत असलेली उपाययोजना याबाबतची माहिती प्रोजेक्‍टरवर सर्व उपस्थितां समोर सादर केली. महापालिकेने कोव्हिड साठी काम करणा-या जबाबदार अधिका-यांची नावे कळवावीत व म्‍हणजे तातडीचे प्रसंगी संपर्क करणे सुलभ होईल अशी सुचना आमदार रविंद्र चव्‍हाण यांनी केली.


तर महापालिकेच्‍या शाळेत ऑन लाईन वर्ग चालू करावेत, या शाळांतील हुशार मुलांना / स्‍कॉलरशिप प्राप्‍त मुलांना , मी स्‍वखर्चाने टॅब पुरवेन, असे आश्‍वासन आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी दिले. महापालिका क्षेञातील कोव्हिड रूग्‍णांची वाढती संख्‍या पाहता स्‍थानिक पातळीवरती पुन्‍हा लॉकडाउन वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी यावेळेस केले, सदर बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ,महापौर विनिता राणे, आमदार विश्‍वनाथ भोईर, आमदार जगन्‍नाथ शिंदे तसेच अप्पर पोलीस आयुक्त दत्‍ताञय कराळे, पालिका  स्थायी समिती सभापती विकास म्‍हाञे, सभागृह नेते प्रकाश पेणकर, विरोधी पक्ष नेते राहुल दामले, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्‍ली, उपायुक्‍त विजय पगार, पल्‍लवी भागवत,  रामदास कोकरे,  उमाकांत गायकवाड, वैदयकिय आरोग्‍य अधिकारी सुरेशकदम, डॉ. पानपाटील , डॉ. सरवणकर पालिका सचिव संजय जाधव तसेच अन्‍य अधिकारी वर्ग उपस्थित होता.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या