Top Post Ad

शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेत जमीनी परप्रांतियांच्या घशात घालण्याचा डाव

शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेत जमीनी परप्रांतियांच्या घशात घालण्याचा डाव

 

बोगस जमीन खरेदी ; पीडित शेतकऱ्याने हरकत घेत केली मोबदल्याची मागणी

 

शहापूर 

 

मौजे बिरवाडी येथील शेतकरी रमेश गोविंद भेरे यांचे आजोबा हरीराम पाटील भेरे हे मृत घोषित नसतांना या पीडित शेतकऱ्यांचे काका जयवंत हरी भेरे यांनी रमेश भेरे यांच्या वडिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत जयवंत भेरे यांचे नावी असलेल्या जमीनी अजय वेदप्रकाश छाब्रा, रजनी अजय छाब्रा, कृष्णगोपाळ गंगादास शर्मा यांना शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत विकल्या असून त्या जमिनी विकासक खरेदी करत असेल तर त्या जमिनींचा खरेदी खत तसेच सातबारा, फेरफार घडू नये अशी विनंती पीडित शेतकरी रमेश गोविंद भेरे, बाळकृष्ण गोविंद भेरे, बळीराम गोविंद भेरे तसेच सुरेश गोविंद भेरे यांनी शहापूर तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांचे कडे ६ मार्च २०२० रोजी लेखी अर्जाद्वारे केला आहे. मागणी मान्य न झाल्यास आम्ही उपोषण किंवा आंदोलन केल्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल असा इशारा देखील रमेश भेरे यांनी दिला आहे.

 

शहापूर तालुक्यातील मौजे बिरवाडी येथील सर्वे नंबर १८७/५, २०६/१, २०८/१, २४०/१४, २५६/४, २६६, २६८/१, २७०/१, २७०/३, २७१/१,२७१/५,२७३/३, १८१/२, २८१/६ तसेच २३/१ ही जमीन  हरकतदार शेतकरी रमेश भेरे यांचे आजोबा हरिराम पाटील भेरे यांचे वडिलोपार्जित आहे. हरिराम भेरे यांचे वडील रामा गणू पाटील हे २४ डिसेंबर १९४६ ला मयत झाले त्यामुळे हरिराम पाटील भेरे हे वारस लागले असून तशी महसुलदप्तरी नोंद देखील आहे. त्यामुळे आम्ही सर्व हरकतदार कायदेशीर वारस आहोत. त्यामुळे आम्हाला याचा मोबदला मिळावा. हरकतदार शेतकरी यांचे आजोबा १९७२ साली परागंदा झाले आहेत. ते मृत असल्याची कुठेही नोंद नसून मृत घोषित करण्यासाठी शहापूर न्यायालयात न्याय प्रविष्ठ आहे. पीडित शेतकऱ्यांचे काका जयवंत हरी भेरे हे उच्च शिक्षित आहेत. तर त्यांचे वडील गोविंद हरी भेरे हे चौथी शिकलेले असल्याने जयवंत हरी भेरे यांनी रमेश भेरे यांच्या वडिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत अजय वेदप्रकाश छाब्रा, रजनी अजय छाब्रा, कृष्णगोपाळ गंगादास शर्मा यांच्याशी हातमिळवणी करत  रमेश भेरे यांचे आजोबांची निम्म्याहून मिळकत  अजय वेदप्रकाश छाब्रा यांना शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत विकली आहे. 

 

फेरफार क्रमांक २१६५ तोंडी जबाबाचा असून हा फेरफार उपविभागीय अधिकारी भिवंडी यांनी रद्द केला आहे त्यामुळे जयवंत हरी भेरे यांच्या नावावर असलेली जमीन व छाब्रा यांना विकलेल्या बेकायदेशीर आहेत. या दोघांवर दंडात्मक करावी व जो विकासक ही जमीन खरेदी करेल त्या जमिनींचा खरेदी खत तसेच सातबारा, फेरफार घडू नये अशी विनंती पीडित शेतकरी रमेश गोविंद भेरे, बाळकृष्ण गोविंद भेरे, बळीराम गोविंद भेरे तसेच सुरेश गोविंद भेरे यांनी शहापूर तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांचे कडे ६ मार्च २०२० रोजी लेखी अर्जाद्वारे केला आहे. मागणी मान्य न झाल्यास आम्ही उपोषण किंवा आंदोलन केल्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल असा इशारा देखील रमेश भेरे यांनी दिला आहे.

 


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com