वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आरपीआय (ए) आक्रमण
महावितरण कार्यलयावर मोर्चा
कल्याण
वाढीव वीज बिलाचा मुद्दा आता गरम होऊ लागला आहे.अनेक झोपडपट्टी वासीयांना मोठे वीज बिल आल्याने या प्रश्नावर आता डोंबिवली आरपीआय (ए) पक्ष आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर आता डोंबिवली आरपीआय(ए)चे शहर अध्यक्ष अंकुश गायकावड यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली महावितरण च्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.या वेळी निवेदन देऊन मागणी करण्यात आली की एकतर झोपडपट्टीतील नागरिकांना जास्त रक्कमेची वीज बिल माफ करावीत किंवा त्या बिलात दुरुस्ती करण्यात यावी. या आर पी आय ने काढलेल्या मोर्चाला डोंबिवलीती झोपडपट्टीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
कोरोना लॉक डाऊणच्या मार्च एप्रिल जून या काळात महावितरणने वीज बिल पाठवली नाहीत.पण या नंतर आलेली बिले ही एकदम ज्यादा रक्कमेची आलेली आहेत.लॉक डाऊन काळात आधीच काम धंदा नसलेल्या नागरिकांचे खाण्या पिण्याचे हाल झालेले असताना आता ही मोठी वीज बिले आल्याने झोपडपट्टीतील नागरिकांनी ही वीज बिल भरायची कशी असा मोठा प्रश्न या झोपडपट्टीतील नागरिकांना पडल्याने या प्रश्नावर आरपीआय (ए) आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या वाढीव आलेल्या वीज बिलाबाबत योग्य निर्णय न घेतल्यात आरपीआय च्या वतीने मोठे आंदोलन पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदना द्वारे आला आहे.डोंबिवली आरपीआय (ए) अंकुश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात डोंबिवली शहर आरपीआय कार्याध्यक्ष किशोर मगरे, सचिव दिनेश साळवे, शहर संघटक समाधान तायडे, उपाध्यक्ष दिलीप काकडे, उपाध्यक्ष सिद्धार्थ बालखंडे आदी बरोबरच अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 टिप्पण्या