राजर्षि शाहू महाराज जयंती दिनी १२०० आदिवासींना शिधा किराणा वाटप

सामाजिक क्रांतीचे व आरक्षणाचे जनक राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती दिनी व
बहुजन संग्रामच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील  १२०० आदिवासींना  शिधा किराणा वाटपपालघर


राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती दिनी बहुजन संग्राम संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील वाडा या दुर्गम तालुक्यातील घोडमाळ गावच्या आदिवासी पाड्यात लॉकडाऊनच्या सुमारे १२०० आदिवासींना प्रत्येकी १२ किलो शिधा - किराणा वाटप करण्यात आले.  'बहुजन संग्राम ' या राज्यव्यापी, सामाजिक,विधायक सेवाभावी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांच्या हस्ते सामाजिक अंतर ठेवून जीवनावश्यक वस्तू-वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी बहुजन संग्रामचे संघटक सचिव विनोद कांबळे, पालघर जिल्हा सरचिटणीस विष्णु वाघ, संघटक तेजस वाघ आदींची प्रामुख्याने उपस्थितीत होती.
१४ एप्रिल पासून ह्या उपक्रमाचा प्रारंभ झाला असुन बहुजन संग्राम ५००० हजार गरजुना शिधा-किराणा देण्याचे उद्दीष्ट ठरल्याप्रमाणे मदत कार्याच्या ५ व्या टप्प्यात १२०० आदिवासींना शिधा-किराणा अन्न धान्य देवून ५ हजार गरजुंना वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.  लॉकडाऊन ३० जून पर्यंत असला तरी लॉकडाऊन नसला किंवा कायम राहिला तरी  कोरोनाच्या या जागतिक संकटकाळात उपासमारीने हैराण झालेल्या गरजुंना त्यांची परीस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत बहुजन संग्रामचा हा  मदत कार्याचा उपक्रम सुरूच राहील. अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम सुरु आहे. यापुढेही दानी व सुस्थितीत असलेल्या व्यक्तींनी सढळ हाताने व उदार अंत: कारणाने सहकार्य करून या गरजू गोरगरीब जनतेचे आशिर्वाद घ्यावे. असे कळकळीचे आवाहन भीमराव चिलगावकर यांनी यावेळी केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA