Trending

6/recent/ticker-posts

कळवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून ज्यूसचे वाटप

कळवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून ज्यूसचे वाटपठाणे


 राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांच्या वतीने दिनांक ७ जून २०२० रोजी ठाणे महानगरपालिकेच्या  कळवा येथील  छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना रियल ज्यूस चे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीच्या परिस्थितीत रुग्णालयातील कर्मचारी अहोरात्र रुग्णसेवेचे काम करत आहेत  गोरगरीब  जनतेला रुग्णसेवा देण्याचे  काम करून जनतेची सेवा करीत आहेत गेल्या दोन महिन्यापासून  कोणतीही सुट्टी न घेता  हे कर्मचारी  काम करीत आहेत  या कर्मचाऱ्यांची प्रतिकारशक्ती  उत्तम राहावी त्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या ठाणे शाखेने  हा समाजोपयोगी उपक्रम हाती घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर  डॉक्टर तायडे यांचेकडे  कर्मचाऱ्यांना  वाटप करण्यासाठी प्रत्येकी एक लिटर च्या  २०० रियल ज्यूस बॉक्सचे हस्तांतरण केले


यासाठी ठाणे जिल्हा संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे  यांनी  विशेष  प्रयत्न केले  या उपक्रमासाठी  डाबर कंपनी आणि  ग्लोबल इंडियन फाउंडेशन यांचे सौजन्य लाभले छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील  नर्सेस भगिनी  आणि वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर्स  यांना  या आरोग्यदायी  ज्यूसचे  वाटप करण्यासाठी डॉक्टर तायडे  आणि योगेश बोरसे यांनी पुढाकार घेतला  याप्रसंगी  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे  कार्याध्यक्ष  मिलिंद सरदेशमुख  मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे  कोषाध्यक्ष  गणेश बकशेट्टी ठाण्यातील समाजसेवक  प्रसाद ठकार  ठाणे सिविल हॉस्पिटल कर्मचारी समन्वय समितीचे  लोखंडे  सिविल हॉस्पिटल कर्मचारी संघटनेचे सहसचिव  कांबळे  आणि  कळव्याच्या  छत्रपती शिवाजी महाराज  रुग्णालय  येथील  प्रतिनिधी उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर तायडे  यांनी  राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे आभार व्यक्त केले 


 


सिव्हील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना एक लिटर रिअल ज्यूसचे वाटप


राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणेचा अभिनव उपक्रम


ठाणे 


ठाणे सिव्हील रुग्णालयाला कोविड रुग्णालय बनविण्यात आलेले असून सध्या तेथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातात त्यामुळे मागील आठवड्यात ठाणे सिविल हॉस्पिटल मधील काही नर्सेस भगिनीना कोरोणाची लागण झाल्यामुळे तेथील कर्मचारी भयग्रस्त झालेला होता याची दखल घेत राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेने ठाणे सिव्हिल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने तेथील सर्व कर्मचाऱ्यांना प्रसिद्ध डाबर कंपनीचे  "रिअल ज्युस" ग्लोबल इंडियन फौंडेशन या संस्थेच्या सौजन्याने प्रत्येकी एक लिटर ज्यूस पाकिटांचे वाटप 300 कर्मचाऱ्यांना करण्यासाठी   आज ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे ॲडिशनल सिव्हिल सर्जन डॉक्टर कांबळे साहेब , डॉ प्रसन्नकुमार देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले


याप्रसंगी ठाणे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे  सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी विशेष प्रयत्न केले याप्रसंगी ठाणे सिव्हिल रुग्णालय समितीच्या कार्याध्यक्ष श्रीमती बागवे मॅडम कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष श्री लोखंडे हे उपस्थित होते तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे कार्याध्यक्ष मिलिंद सरदेशमुख बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष श्री गणेश बकशेट्टी, समाजसेवक श्री प्रसाद ठकार हे उपस्थित होते त्याचप्रमाणे ठाणे सिव्हिल रुग्णालयातील मेट्रन व नर्सेस भगिनी, तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचारीही उपस्थित होते.Post a Comment

0 Comments