कल्याण पालिकेतील त्या २७ पैकी १८ गावांची वेगळी उपनगर परिषद
कल्याण
कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची नगरपरिषद आणि ९ गावे महापालिकेत ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला होता, मात्र त्याची अधिसूचना जारी केली नव्हती. आज राज्य शासनाने वगळलेल्या १८ गावांसाठी कल्याण उपनगर नगरपरिषद स्थापन करून त्याची प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. आता कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांपैकी १८ गावांची वेगळी नगर परिषद स्थापन होणार असून, कल्याण उपनगर नगरपरिषद असे नाव त्याला देण्यात आले आहे.
घेसर, हेदुटणे, भाल, उंब्रोली, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडीवली ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांचा या नगरपरिषदेत समावेश आहे. हा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. मात्र त्याची अधिसुचना पालिकेला प्राप्त झालेली नसल्याचे पालिका प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी असल्याने १८ गावांच्या नगरपरिषदेच्या सरकारी निर्णयाला विरोध करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या