टेलर, ट्रम्प आणि आंबा
२५ मे रोजी अमेरिकेत George Floyd नावाच्या कृष्णवर्णीय माणसाचा पोलिसांच्या क्रूरतेमुळे मृत्यू झाला. त्या निशस्त्र इसमाच्या नरडीवर पाय ठेवून त्याच श्वास कोंडून निर्दयीपणे जीव घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्याचा विडिओ viral झाला आणि अमेरिका हादरून गेली. अमेरिकेतल्या नेटिझन्सनी #BlackLivesMatter #JusticeForGeorgeFlyod hashtags ने आपला निषेध नोंदवला. अमेरिकेतील अनेक सेलिब्रिटी टेलर स्विफ्ट, लेडी गागा, रिहाना, बिली एलिश, विल स्मिथ यांनी social media द्वारे आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे यातले बरेच जण स्वतः White आहेत पण पोटतिडकीने या विषयावर व्यक्त झाले. यानंतर देशभरात काही आंदोलनाच्या घटना घडल्या.
ट्रम्पने पुन्हा एक ट्विट करून looting असेल तर shooting होईल अशी दर्पोक्ती केली. हा ट्विट म्हणजे वर्णभेदी आणि स्त्रीद्वेषी ट्रम्पच्या असंवेदनशीलतेचा कळस होता. या हत्येबद्दल यत्किंचितही खेद व्यक्त न करणाऱ्या ट्रम्पचा टेलर स्विफ्टने ट्विट मधून खरपूस समाचार घेतला,...... तुझ्या पूर्ण कार्यकाळात तू वर्णभेद आणि गौरवर्णी श्रेष्ठत्व (White suprmacy) या गोष्टींना कायमच चालना देत आला आहेस आणि आता येत्या नोव्हेंबरला आम्ही तुला घरी बसवू असा खुला आव्हान वजा इशारा दिला. हा ट्विट वेगाने जगभरात पसरला आणि जगभरातून ट्रम्पवर लोकांनी टीकेचे आसूड ओढले. ट्रम्पच्या भक्तानी आणि IT cell ने टेलरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला
पण
सामान्य लोक आणि टेलरच्या जगभरातील करोडो मध्ये असलेल्या फॅन बेस समोर त्यांचं फारसं चाललं नाही .शेवटी ट्रम्प (80M flwr ) ने 2 तासातच पुन्हा 2 ट्विट करून सारवा सारव केली पण टेलर ( 86 Million Flwr ) च्या ट्विट ने जगभरात जो परिणाम व्हायचा तो झालाच. एका तीस वर्षाच्या अराजकीय युवतीसमोर जगातील सर्वात शक्तिशाली महासत्तेच्या अध्यक्षाने सपशेल माघार घेतली. याधीही टेलरने LGBT equal rights संदर्भात ट्रम्प ला धारेवर धरले होते आणि एरवी आक्रमक असणारा ट्रम्प आजवर तिला काहीच प्रत्युत्तर देऊ शकलेला नाहीये......
हे सगळं पाहता भारतीय सेलिब्रिटी किती कणाहीन आहे हे जाणवतं..... गेल्या काही दिवसात भारतात सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेकडो बळी गेले ..... करोडो लोक हालअपेष्टा सहन करत आहेत .....पण Mainstream अभिनेते, खेळाडू, गायक आणि इतर क्षेत्रातील कोणीही celebrity सरकारला एक प्रश्न विचारायला धजावत नाही आहेत....... पडद्यावर दबंग, खिलाडी, किंग, डॉन, नायक, महानायक रंगवणारे अभिनेते असोत किंवा मैदानावर मास्टर ब्लास्टर , फिनिशर म्हणून ओळख असलेले खेळाडू असो..... खऱ्या आयुष्यात यापैकी कोणीही टेलर सारखी खमकी भूमिका घ्यायला तयार नाही....
हि भीती म्हणावी कि आणखी काय.
जेव्हा याना प्रश्न विचारायची संधी मिळालीच...... तेव्हा त्यांनी अराजकीय आंबा चोखून खाता कि कापून असा गहन प्रश्न विचारला. सामान्य लोकानी आवाज उठवणे आणि सेलेब्रिटिनी आवाज उठवणे यात थोडा फरक आहे. सेलेब्रिटिना मोठा चाहता वर्ग असतो, अनेक लोक याना आदर्श मानतात, राजकीय पातळीवर पण याना मान असतो. या privileges चा उपयोग या लोकांनी समाजासाठी देशासाठी खरं तर केला पाहिजे. पण अनेक कलाकार सत्तेची चाटूगिरी करण्यात धन्यता मानतात.
आपलं करिअर ,आपला fanbase याला धक्का पोहोचू नये म्हणून बोटचेपी भूमिका घेणाऱ्या सेलिब्रिटीना आपण किती डोक्यावर घ्यायचं हे आपण ठरवायला हवं.
यातील अनेक जणांनी आर्थिक मदत केली आहे त्याचं कौतुक आहे. पण जेव्हा *सत्तेविरुद्ध बोलायचं प्रश्न येतो तेव्हा हे reel life हिरो real life मध्ये झिरो होऊन जातात......एक स्त्री असून टेलरने आजपर्यंत कोणालाही न घाबरता आपल्या करिअरचा विचार न करता कायम सामाजिक मुद्द्यावर भाष्य आणि कृती केली आहे. अर्थात तिथल्या नागरिकांनी आणि जगभरातल्या फॅन्सनी तिला कायम पाठिंबा दिलाय. सरकार विरोधात बोलूनही तिला प्रतिष्ठेचा "Artist of The Decade" (2010-2019) मिळालाय आणि 2019 चा अमेरिकेतला best selling album तिचाच Lover हा अल्बम आहे. आपल्या इथे दीपिकाने stand घ्यायचा प्रयत्न केला पण आपण तिला ट्रोल केलं आणि तिच्या चित्रपटाला flop केलं. नागरिक म्हणून आपण सुद्धा कोणाला डोक्यावर घ्यायचं आणि कोणाला नाही हे अजूनही आपल्याला समजत नाही.
4 महिन्याआधी टेलरने "Only The Young" नावाचं पूर्णपणे राजकीय गाणं रिलीज केलं ज्यात ती सत्ताधीशांचे हात रक्ताने माखलेत आणि आता फक्त तरुणच देशाला वाचवू शकतात अशा प्रकारे तरुणांना बदलासाठी पुढे येण्याचं आव्हान केलं. आपल्याकडे "4 बॉटल वोडका काम मेरा रोजका " गाणं बनतं आणि ते आपण डोक्यावर घेतो. सरतेशेवटी इतकंच सांगावं वाटतं कि सामान्य नागरिक असो किंवा सेलेब्रिटी आपली नैतिक जबाबदारी आहे चुकीला चूक म्हणण्याची. सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह हा गैरसमज काढून टाकल्याशिवाय देशाला या संकटातून बाहेर काढणं शक्य नाही. चुकीचं घडताना दिसत असूनही तटस्थ राहणं हा शुद्ध भेकडपणा झाला टेलर स्विफ्टचं एक वाक्य आहे जे या क्षणी आपल्याला सर्वाना लागू पडतं....
" I need to be on the right side of history " जेव्हा इतिहास लिहला जाईल तेव्हा आपण योग्य बाजूने होतो अशी आपली नोंद इतिहासात व्हावी असा प्रयत्न केला पाहिजे. Really proud of you queen !
0 टिप्पण्या