वाढदिवसानिमित्त १० हजार गोरगरीब कुटुंबाना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
शहापूर
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ परिवारातर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. परंतु, सध्या महाराष्ट्र राज्याला कोरोनाच्या महाभयंकर विषाणूने विळखा घातला असून. राज्य प्रशासनाबरोबरच वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा कर्मचारी तसेच पोलीस जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. लॉकडाऊन मुळे गोरगरीब नागरिक आणि मजूर वर्ग यांचे रोजगार अभावी खाण्यापिण्याचे अतोनात हाल होत आहेत. अशा प्रसंगी, कोणत्याही प्रकारचा सोहळा साजरा न करता जिजाऊ संस्थेमार्फत एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे शासनाला सहकार्य करण्याचा निश्चय निलेश सांबरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केला आहे.
लॉकडाऊन मुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत होऊन जेवणाचीही भ्रांत पडली आहे. त्यामुळे भिवंडी ग्रामीण व शहरी भागातील १० हजार गोरगरीब कुटुंबाना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी जिजाऊ संस्थेच्या ठाणे जिल्हाप्रमुख मोनिकाताई पानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व जिजाऊ स्वयंसेवकांच्या मदतीने गावोगावी अन्नधान्य किट घरपोच वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ५० दिवसापासून हा मदतीचा ओघ सुरू आहे. संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये १ लाख कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे. आत्तापर्यंत ७० हजारहुन अधिक कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचविण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेला या उपक्रमाचा मोठा लाभ झाला आहे.
"कोरोनाचे संकट गंभीर असले तरी त्याचा सामना करण्यासाठी गोरगरिबांना आवश्यक ती मदत करणे अत्यंत गरजेचे असून अशा संकटकाळी जिजाऊ संस्था आपलं कर्तव्य बजावत असल्याने असंख्य कुटुंबाना दिलासा मिळाला आहे. यापुढेही जिजाऊ संस्था तळागाळातील गोरगरिबांच्या सेवेमध्ये उपलब्ध असेल "असे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या ठाणे जिल्हा प्रमुख मोनिका मोहन पानवे यांनी बोलताना सांगितले.

संपुर्ण देशात सद्या कोरोनाने थैमान घातला असून आता शहरी भागासहित ग्रामीण भागात देखिल या विषाणुचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी शिफारस केल्याप्रमाणे होमिओपॅथिक ' अर्सेनिक अल्बम - ३०' या गोळ्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असून कोरोनाशी लढण्यास साहाय्य करते. म्हणूनच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांनी शहापुर तालुका अध्यक्ष हरेश पष्टे यांच्या मार्फत वासिंद मधील 300 कुटुंबांना अर्सेनिक अल्बम ३० यागोळ्यांचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
0 टिप्पण्या