आमदार सरनाईक यांच्या पुढाकाराने शिवसेना शाखांचे दवाखान्यात रुपांतर
ठाणे
शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत शाखा तिथे दवाखाना "या उपक्रमाला सुरवात झाली असून, जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. शरीराचे तापमान तपासणीचे यंत्र तसेच Oxygen level तपासण्यासाठी देखील एक एक यंत्र प्रत्येक शाखेत उपलब्ध करण्यात आले असून त्याद्वारे लोकांची तपासणी करण्यात येत आहे. त्याचसोबत ज्या गोळ्या डॉक्टरांच्या Prescription शिवाय दिल्या जातात उदा - व्हिटॅमिन, प्रोटीन, सर्दीची ची औषधें ती देखील लोकांना मोफत देण्यात येत आहेत. या शिबिरात तपासणीला येणाऱ्या लोकांना Sanitizer व मास्क मोफत देण्यात येतं आहेत. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने Social Distancing ची विशेष काळजी घेऊन हा उपक्रम सुरु आहे, तसेच तपासणी करणाऱ्या मेडिकल अधिकाऱ्याला संपूर्ण Ppe देण्यात आले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व युवासेनेचे राष्ट्रीय सचिव पूर्वेश सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाणे आणि मिरा भाईंदर मधील सर्वसामान्य जनतेसाठी " शाखा तिथे दवाखाना " या अत्यंत महत्वपूर्ण उपक्रमाला आजपासून सुरवात करण्यात आली आहे. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते.
0 टिप्पण्या