म्हणूनच माझगाव ताडवाडीत कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकला नाही
मुंबई
कोरोना महामारीचा प्रादुर्भावन रोखण्याकरिता शासनाने ,प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई म्युनिसिपल"ई " विभागातील माझगाव ताडवाडीतील सर्व सामान्य दाट कामगार लोकवस्तीतील नागरिक सर्व नियमांचे पालन करित आहेत. माझगाव ताडवाडीत ब्रिटिश कालीन १६ बी.आय.टी.चाळी आहेत त्या पैकी चाळ क्र.८ मधील तरुण मित्र मंडळाने सुद्धा शासनाने,प्रशासनाने लावलेले नियम ,उपाययोजनाची अंमलबजावणीअगदी तंतोतंत पार पाडत आहे .प्रत्येक चाळीत ८० खोल्या आहेत आणि सरासरी चाळीतील एकूण लोकसंख्या ३५० ते ४०० पर्यंत असून लोक दाटीवाटीने राहून आपला उदरनिर्वाह करत आहेत तसेच तेथे सार्वजनिक शौचालय आहे.लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत तरुण मित्र मंडळाने कोरोनावर मात करण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या .त्यामुळे आजपर्यंत चाळ क्रमांक ८ मधील इमारतीत एकही कोरोना पोझीटीव्ह रुग्ण आढळला नाही.
ह्या लॉकडाउनच्या काळात मंडळाच्या वतीने संपूर्ण चाळीत नियमितपणे निर्जंतुकीकरनाची फवारणी करणे, चाळीचे मुख्य प्रवेशद्वार वेळेत उघडण्याचे आणि वेळेत बंद करण्याचे नियम चाळीतील राहिवाश्यांच्या एकमताने ठरविण्यात आले .चाळीच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ भरलेल्या पाण्याचा ड्रम आणि हँड सॅनिटाइझर /साबण ठेवण्यात आला.जेणेकरून बाहेरून आलेल्या व्यक्तीने आपले हात पाय चांगल्यारित्या स्वछ धुवून,सॅनिटराईझ करून मगच चाळीत प्रवेश करावा असे सांगण्यात आले. चाळीतील रहिवाश्यांनी अत्यंत महत्वाच्या कामासासाठीच घरा बाहेर पडावे व ठरलेल्या वेळेत परत यावे . तोंडावर मास्क लावने.ग्रुपने एकत्र बसू नये. तसेच चाळीमध्ये सार्वजनिक शौचालाय असल्याने शौचालयात जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
जस जशी शासनाची मार्गदर्शक तत्वे बदलत होते तस तसे चाळीतील नियम बदलत असे.आणि चाळीतील प्रत्येक रहिवाशी मंडळाच्या निर्णयाला प्रतिसाद देत आहेत . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्याच्या आवाहनाला व शासन,प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन केल्याने ही चाळ कोरोनामुक्त आहे.अशाच प्रकारे सर्व विभागातील,चाळीतील रहिवाशांनी अत्यंत शिस्तबद्ध ,काटेकोरपणे पालन करावे व शासनाला ,प्रशासनाला मुंबई,महाराष्ट्र ,कोरोनामुक्त होण्यास सहकार्य करावे असे आवाहन तरुण मित्र मंडळाचे सहसचिव नागेश जाधव यांनी मुंबईकरांना केले आहे .
नागेश जाधव
सह-सचिव,तरुण मित्र मंडळ.
9820797680
0 टिप्पण्या