अदिवासी संस्कृतीत कर्मकांडांची भेसळ
प्राचीन काळापासून आदिवासी हा निरागस व भोळाभाबडा असा स्वभाव असलेला समाज आहे. कोणतीही कर्मकांडे (पूजा, पाठ, नारळ ,बकरे, कोंबडे बळी देने , दगडाला शेंदूर लावणे व त्यालाच देव म्हणवणे इ) करत नव्हता आदिमानव हाच खरा आदिवासी आहे , काळाच्या ओघात इतरांसारखे राहणे, खाणे पिणे झाले. अनेक संस्कृती मिक्स झाल्या व आदिवासी स्वतःची ओळख हरवायला लागला. आजचा आदिवासी म्हणवणारा मानव खूपच वेगळा,निराळा आहे .आधुनिकतेच्या नावाखाली,स्वतःची ओळख पार पुसून बसला. हौस, मज्जा,चंगळवाद यांचे आक्रमण कधी झाले याचे त्याला कळलेच नाही .कंदमुळे खाणार चायनीज खायला लावला ,झऱ्याचे पाणी सोडून,डिस्टिल्ड वॉटर (दारू,बीअर ,व्हिस्की, रम,क्वाटर, घसटी, मोहाची) प्यायला लागला .सांबळ, तारपा सोडून , डिस्को ,ताश्या वर ताल धरायला लागला. सभ्यता सोडून चोरी ,दरोडे, व्याभिचार करायला लागला.
किंबहुना तशी परिस्थिती निर्माण केली गेली,परंपरागत सण उत्सव सोडून नवीन सण साजरे करू लागला,मुळात देवी देवता पुजतच नव्हता,पण त्यांना वेगवगळी नावे देऊन तेही आणले आता तर वैदिक देवी देवता घराघरात पोहचल्या (इतर धर्मियांच्या ही) गेल्या, उपासतापास, तीर्थ,यात्रा, दान धर्म हे ही सोबत करायला भाग पाडले.आदिमानवाच्या अंगात येत नव्हते ,पण तेही आता यायला लागले , आदिमानव संपूर्ण अज्ञानी होता मग जादू ,टोना ,अघोरी विद्या,मंत्र तंत्र,भगत ,बुवा ,महाराज, बाबा,हे कुठून आले. की सोईस्कर रित्या आदिवासी धर्मात घुसवले.हे सर्व वैदिक व इतर धर्मातील कर्मकांडे कधी आली, व घराघरात,गावा गावात कधी भांडणे,पार्ट्या झाल्या हे समजलेच नाही,
आज आदिवासी बांधव एकोप्याने राहणारा, एकमेकांवर कोरघोडी करू पाहतो आहे,एकमेकांना संपवण्याचे राजकारण करतोय. खून दरोडे ,बलात्कार, व्यभिचार का करतो,गुहेत राहणार माफक गरजा असलेला मनुष्य एवढा अनावर का झाला .मोबाईल, टीव्ही,हे सर्व वैदिक धर्मियांच्या हाती आहेत ते काय दाखवतात,त्याचा परिणाम होऊन पूर्ण समाज बर्बादीला आलेला आहे, आदिवांसी वर वाढणारे अत्याचार हे काय दर्शवतात,शाळा कॉलेज मध्ये होणारे अन्याय,का व कस्यासाठी होतात, हे सर्व वैदिक व इतर धर्माची दहशत आहे,वैदिक व इतर धर्म अनुसरा मग तुम्हाला सहानुभूती मिळेल,अन्यथा अन्याय सहन करावाच लागेल असे षडयंत्र चालू आहे. आदिवासी समाज संघटित होऊ नये व तो देव धर्म करत राहावा व त्याचा फायदा इतर धर्मीयांना व्हावा हाच हेतू आहे ,प्रत्येक प्रांत व देशानुसार वेगवेगळ्या धर्माचे अतिक्रमण आदिवासी समाज सहन करतो आहे ,त्याची गळचेपी होते आहे,आज सर्व जगातील आदिवासी बांधव बरबटलेला आहे अंधश्रद्धेत घुसमटतो आहे त्याला यथार्थ ज्ञानाची गरज आहे.
सर्व धर्मात त्याला हीन वागणूक मिळते आहे, सर्व मानव समान असतांना उच्च नीचतेच्या बेड्या ठोकून गुलाम बनून राहिला आहे ,तो त्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही .म्हणून एका धर्माचि गरज आहे ,जसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जात- पात विरहित धर्माची दीक्षा घेतली ,त्याच प्रमाणे आदिवासी धर्म असावा ,जो उच्च -निश्च शी ,थू, विटाळ मानणारा नसावा तर आणि तरच आदिवासी धर्मकोडसाठी चाललेली चळवळ सार्थकी ठरेल आणि आदिवासी समाज्याला ज्ञानाचे, विकासाचे, शांतीचे दरवाजे खुले होतील
--- काशिराम धोंडगा
सामाजिक विस्लेषक(analysis) व
प्राणी व मानव उत्क्रांती(Human evolution)चे अभ्यासक
0 टिप्पण्या