Trending

6/recent/ticker-posts

शहापूर परिवहन एस.टी. आगाराचे अडीच कोटीचे नुकसान 

परिवहनच्या लाल परीला लॉक डाऊनचा जबर फटका 


शहापूर परिवहन एस.टी. आगाराचे अडीच कोटीचे नुकसान शहापूर 


कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे गेली अडीच महिने बंद पडलेल्या एसटी सेवेचा जबर फटका शहापूर परिवहन महामंडळाला बसला आहे.लॉक डाऊनमुळे ब्रेक लागलेल्या परिवहनच्या लाल परीला मोठया अर्थीक नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे .जवळपास अडीच कोटी रुपयांच नुकसान हे शहापूर परिवहन आगाराचं झालं आहे .हा अर्थीक नुकसान महामंडळाच्या तीजोरीला सोसावा लागला आहे .  


ठाणे जिल्हयातील शहापूर एसटी आगारात एकूण ५५ बस आहेत यातील ६ बस या लांबपल्यावर धावतात तर काही बस तालुक्यातील ग्रामीण भागात किन्हवली ,डोळखांब ,चोंढे ,शेणवे,टाकिपठार खरांगण ,कानवे ,आपटे ,आस्नोली ,तर भिवंडी ,मुरबाड,वाडा,कसारा ,या मार्गावर चालविल्या जात आहेत यातून प्रतिदिन रोज अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न हे ग्रामीण भागातील प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून शहापूर परिवहन महामंडळा मिळते आहे मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लॉक डाऊन जाहीर झाले परिणामी या लॉक डाऊन काळात राज्यातील बससेवा ठप्प पडली आणि लाल परीच्या चाकांना ब्रेेेक लागला जवळपास अडीच महिन्याच्या कालावधीत अडीच कोटी रुपयांचे नुकसान हे शहापूर आगाराला सहन करावे लागले आहे. अशी माहिती शहापूर आगारातुन मिळाली आहे.


काही अंशी अत्यावश्यक सेवा म्हणून बससेवा सुरु होती.मात्र कोरोनाच्या दहशतीने अद्यापही प्रवाशांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरविल्याने लॉकडाऊनमध्ये धावणाऱ्या लालपरीचे काऊंटडाऊन जुळत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बसच्या या फेऱ्या वाया जात असून उत्पनाचे तीनतेरा वाजत असल्याचे  समोर येत आहे. लॉकडाऊनमुळे एसटी सेवाचा पूर्णत बोजवारा उडाला आहे. मात्र, काहीअंशी धाडसी निर्णय गेऊन एसटी महामंडळाने आपल्या जवळच्या मार्गावर एसटीच्या फेऱ्या सुरु केल्या. किन्हवली मार्गावर दिवसातून अशा एक-दोन फेऱ्या सुरु आहेत. मात्र, या फेऱ्या वाया जाताना दिसून येत आहेत. एसटी बसमध्ये केवळ २ ते ३ प्रवासी बसलेले दिसून येतात. यापूर्वी प्रत्येक बस थांब्यावर प्रवाशांच्या चढ-उतारासाठी थांबणारी एसटी आता एकही प्रवासी बस थांब्यावर दिसत नसल्याने अगदी सुसाटपणे निघून जात आहे. बऱ्याच महिन्यांनी धावत असलेली लालपरी पाहताना अनेकांना त्याविषयी कुतूहलही वाटत आहे. गेले अडीच महिने कोरोनाची टांगती तलवार सर्वसामान्यांच्या डोक्यावर अजूनही लटकलेलीच आहे. . त्यामुळे एसटी बसला अशा ग्राहक प्रवाशांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.


स्थानिक प्रवाशांमध्ये प्रवासाची भिती अधिक


मुंबई, ठाणे, कल्याण ,डोंबिवली, भिवंडी ,पुणेसारख्या शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शहापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे.त्यामुळे शहरांमधून येणाऱ्या चाकरमान्यांनी एसटीतून प्रवास केला तर ही भिती स्थानिक प्रवाशांमध्ये आजही आहे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या स्थानिक प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे . एकिकडे लॉक डाऊन काळात झालेले अर्थीक नुकसानाचा बसलेला जबरदस्त फटका महामंडळाला सोसावा लागला असतानाच दुसरीकडे कोरोनाच्या भीतीने अध्यापही बसला प्रवाशांनी प्रतिसाद दिलेला दिसत नसल्याने परिवहन महामंडळाची लाल परी बस संकटात सापडलेली दिसत आहे.


शहापूर परिवहन महामंडळास लॉक डाऊनच्या काळात जवळपास अडीच कोटींचे नुकसान झाले असून महामंडळाला हा मोठा अर्थीक तोटा सहन करावा लागला आहे परंतु या संकटाला तोंड देत लवकरच सुरळीतपणे ग्रामीण भागात प्रवासी वाहतुकीसाठी बससेवा सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे . - पुनम मोरे, शहापूर आगार व्यवस्थापक


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या