Trending

6/recent/ticker-posts

रेल्वेच्या कोरोना आयसोल्युशन वार्ड कारशेडला पडून 

रेल्वेच्या कोरोना आयसोल्युशन वार्ड कारशेडला पडून मुंबई


देशावर कोरोनाचे मोठे संकट आले असताना मोठा गाजा वाजा करून रेल्वेने आयसोल्युशन वार्ड तयार केले. पण कोरोना संकटात हे वार्ड का वापरात येत नाहीत. ह्यामध्ये नक्की काय घोटाळा आहे. ह्याचे उत्तर रेल्वे मंत्र्यांनीच द्यावे असे बोलले तर वावग ठरणार नाही. जर आयसोल्युशन रेल्वे दिल्लीला दिल्या असतील तर देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्ण जास्त होत आहेत मग महाराष्ट्राला आयसोल्युशन रेल्वे गाड्या का नाही दिल्या. रेल्वे सुरू असताना सर्वात जास्त महसुल महाराष्ट्रातुन रेल्वेला मिळतो मग महाराष्ट्राकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न सेट्रल रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य अमोल कदम यांनी विचारला आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना साधनांची कमतरता भासत होती. त्यावेळी आयसोल्युशन वार्ड प्रचंड कमी प्रमाणात होते. ती उणीव भरून काढण्यासाठी रेल्वेचे डबे आयसोल्युशन वार्ड तयार करण्यात आले. अशा तऱ्हेने रेल्वे कामगारांनी 40 हजार बेड तयार केले, या करिता लाखो रुपयांचा निधी रेल्वेने तयार केला होता. या रेल्वे डब्यातील आयसोल्युशन वार्ड हे कोरोना रुग्णाकरिता वापरले जाणार होते. तसेच ज्या ठिकानी रुग्णालयाची कमतरता असेल त्या ठिकाणी ह्या आयसोल्युशन वार्ड चा वापर होणार होता. पण हे आयसोलुशन वार्ड केलेल्या रेल्वे गाड्या मुंबईच्या लोअर परळ, माटुंगा वर्कशॉप, परळ वर्कशॉप, एलटीटी कोचिंग सेंटरमध्ये तसाच उभ्या असून कोरोना रुग्णाकरिता ह्या आयसोल्युशन रेल्वे वार्डचा वापर का केला नाही.असा प्रश्न निर्माण झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या