देव दर्शन दूरूनच होणार, तीर्थ प्रसादाचा लाभही मिळणार नाही
मंदिर प्रवेशापूर्वी कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आंध्र प्रदेशातील श्रीशैलमचे मल्लिकार्जुन मंदिर आणि विजयवाडाचे कनकदुर्गा मंदिरही सोमवारपासून सुरू होत आहे. केरळातील तिरुवनंतपुरमचे पद्मनाभ मंदिर मंगळवारी सुरू होईल. रोज ७५० जणांना दर्शनासाठी ऑनलाइन स्पॉट ऑफलाइन (ऑनलाइनच्या शिल्लक) नोंदणी तिकीट घ्यावे लागेल. सबरीमाला मंदिर १४ जून ते १९ जूनपर्यंत सुरू होईल. रोज २०० जणांना दर्शन मिळेल. पद्मा नदीत स्नान करता येणार नाही. केरळात मंदिर प्रवेशापूर्वी भाविकांना आपण कोविडमुक्त असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. असे मंदीर प्रशासनाने आदेश दिले आहेत.
फिजिकल डिस्टन्सिंगसाठी असलेल्या चिन्हावरच उभे राहणे, मास्क वापरणे बंधनकारक, किमान ६ फूट अंतर ठेवावे जाण्या-येण्यासाठी वेगळे मार्ग तसेच मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे गरजेचे.अशा बंधनकारक अटींवर आता देवदर्शन होणार आहे. देशातील धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आल्याची घोषणा व गाइडलाइन जाहीर केल्यानंतर शुक्रवारपासून बहुतांश धार्मिक स्थळांची साफसफाई सुरू करण्यात आली आहेत. गाइड लाइनप्रमाणे तयारी करण्याची व्यवस्था करण्यात येत होती. याशिवाय प्रवेश करताना हातपाय धुवावे लागणार,,हात सॅनिटाइझ करावे लागतील. प्रत्येक भाविकांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल. मूर्ती, धर्मग्रंथांना स्पर्श करण्याची परवानगी नाही. प्रसाद व तीर्थ मिळणार नाही. भजन-कीर्तन असे कार्यक्रम होणार नाहीत. अशा नियमांचेही पालन करावे लागणार आहे.
विविध ठिकाणी असलेली मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा व चर्चेसच्या बाहेर सॅनिटायझेशनचे टनेल तयार करण्यात येत आहेत. याचा वापर धार्मिक स्थळी प्रवेश करताना होईल. तेथे बहुतांश ठिकाणी धार्मिक स्थळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी वर्तुळे तयार करण्यात येत आहेत. शुक्रवारी दिल्लीतील लोधी रोडवरील साई मंदिर, झंडेवाला मंदिर व मुंबईतील हाजी अली दर्गा, माहिमचा दर्गा व सिद्धिविनायक मंदिर, चेन्नईतील आर. सी. चर्च, पंचकुला येथील नाडा साहिब गुरुद्वारा व भोपाळ येथील माता वैष्णोधाम नवदुर्गा मंदिर आदींची साफसफाई सुरू होती. दिल्लीच्या मंदिर मार्गावरील सेेंट थॉमस चर्चसुद्धा ८ जूनपासून उघडणार आहे. येथील प्रशासकांनी सांगितले, फिजिकल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने योजना तयार केली जात आहे. तर दिल्लीच्या हनुमान मंदिराचे महंत जगन्नाथ दास यांनी सांगितले, एकावेळी ५ ते १० भाविकांनाच प्रवेश देण्यात येत आहे. सर्व भाविकांना प्रवेश दारावरील सॅनिटाइझ टनेलमधूनच घ्यावा लागणार आहे.
तिरुपती मंदिरात दहा वर्षांखालील लहान मुले व ६५ वर्षे वयावरील वृद्धांना प्रवेश देण्यात येणार नाही.
तिरुमला येथील प्रसिद्ध व्यंकटेश्वर मंदिरात ८ जूनपासून तीन दिवसांचे ट्रायल सुरू होणार आहे. यानंतर भाविकांसाठी ११ जूनपासून मंदिर उघडणार आहे. मंदिरात दररोज सकाळी ६.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत ६ ते ७ भाविक दर्शन घेऊ शकतील. तर मागील काळात दररोज ६० ते ७० हजार भाविक दर्शन घेत होते. तिरुपती देवस्थानचे चेअरमन वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी सांगितले, दर तासाला फक्त ५०० भाविक दर्शन घेऊ शकतील. मंदिरात दहा वर्षांखालील लहान मुले व ६५ वर्षे वयावरील वृद्धांना प्रवेश देण्यात येणार नाही. अशाच प्रकारे कंटेन्मेंट झोनमधून आलेल्या भाविकांनाही प्रवेश प्रतिबंधित असेल. भाविकांची व्यवस्था पाहणारे सर्व कर्मचारी पीपीई किट वापरतील. भाविकांच्या प्रवासाचा इतिहास पाहिला जाईल. दररोज ३०० रुपये किमतीचे ३ हजार तिकिटे विशेष दर्शनासाठी ऑनलाइन उपलब्ध राहतील. तर नि:शुल्क ३००० तिकिटे उपलब्ध असतील.
डोंगरावर चढण्यापूर्वी सर्व वाहने सॅनिटाइझ केली जातील. तर बॅरिकेडझस दर दोन तासांनी सॅनिटाइझ केली जातील. पायी मार्ग काही दिवसांसाठी बंद राहील. हुंडीजवळ भाविकांना हर्बल सॅनिटायझर उपलब्ध असेल. भाविकांना हुंडीला स्पर्श करता येणार नाही. अन्न प्रसाद मर्यादित भाविक घेऊ शकतील. प्रत्येक गेस्ट हाऊसमध्ये केवळ दोन भाविकांना राहण्याची सोय असेल. २ दिवसांपेक्षा अधिक काळ त्यांना थांबता येणार नाही. तिरुमला येथे खासगी हॉटेल्स उघडण्याची अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. अनेक रीतिरिवाजांवर प्रतिबंध असेल. केशदान करण्यावर कोणताही निर्णय झालेला नाही
सुमारे ८० दिवसांच्या लॉकडाऊननंतर तिरुपती-तिरुमला येथे श्री व्यंकटेश्वराचे दर्शन आज सोमवारपासून सुरू होत आहे. सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत दर्शन सुरू राहील. या काळात दर तासाला ५०० भाविकांना दर्शन घेता येईल. तिरुपती-तिरुमला देवस्थानम ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी सांगितले की, सुरुवातीचे तीन दिवस दर्शनाची ट्रायल होईल, ज्यात मंदिराचे सुमारे २१ हजार पुजारी, कर्मचारी व त्यांचे नातेवाईक आणि तिरुपतीचे स्थानिक लोक दर्शन घेतील. ६५ वर्षांवरील व्यक्ती व १० वर्षांखालील मुले यांना सध्या दर्शनाची परवानगी मिळणार नाही. भितींना स्पर्श न करणे तसेच ग्रील न पकडता चालण्याची सूचना भाविकांना करण्यात आली आहे.
दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणीच्या आधारे टाइम स्लॉट घ्यावा लागेल. ११ जूनपासून सर्वसामान्यांसाठी दर्शन सुरू होईल. कल्याणकट्ट्यावर भाविकांना केशदान करता येईल. तेथे दोन नाभिकांत १० फुटांचे अंतर राहील. अन्नदानम हॉलमध्येही एक हजारऐवजी २०० जणांना प्रवेश मिळेल. मंदिरात फुलांचे हार किंवा अर्पण करण्यासाठी वस्तू नेण्यास परवानगी नसेल. चरणामृत (तीर्थम) आणि प्रसादरूपी मिळणारे छोटे लाडूही मिळणार नाहीत. भाविकांच्या डोक्यावर सतारी (आशीर्वादाचा टोप) ही ठेवली जाणार नाही. दंडवत करणे आणि परिसरात बसण्यास बंदी राहील.
0 टिप्पण्या