Trending

6/recent/ticker-posts

कल्याण कृषी विभागाकडून खरीप हंगामाची सुरुवात

     

कल्याण

 

तालुक्यात भातपिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ६०६४ हेक्टर आहे.सन २०१९-२० मध्ये ५२९० हे. क्षेत्रावर भात लागवड केली होती.कोविड च्या पार्श्वभूमीवर चालू वर्षी हे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.कामकाजा करिता बाहेर जाणारा शेतकरी लॉक डाऊन मुळे घरी अडकल्या मुळे भात पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, कृषी मंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार खते , बियाणे खरेदी करतांना कृषी सेवा केंद्रात गर्दी होऊ नये म्हणून गावातील बचत गटातील प्रतिनिधी द्वारे कृषी सेवा केंद्राशी सांगड घालून शेतकऱ्याना बांधावर खत, बियाणे पुरवठा सुरू आहे.

        कल्याण तालुक्यात चालू वर्षी खरीप हंगामात भात पिकाच्या एकूण ९ शेती शाळा व तूर पिकाच्या २ शेतीशाळा घेण्याचे नियोजन करून प्रत्येक्षात प्रत्येक शेती शाळेचे २ वर्ग सुद्धा झाले आहेत.सदरच्या शेतीशाळे द्वारे ५० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे.त्याकरिता २० क्विंटल बियाणे निवड केलेल्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.      खरीप हंगामपूर्व बैठकी मध्ये आमदार किसन कथोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ४१० हेक्टर क्षेत्र करिता बांधावर तूर पिकाच्या प्रात्यक्षिक घेण्यात येणार असून त्या करिता ५.१२५ क्विंटल तूर बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे.     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  रोजगार संधीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून,तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजने  अंतर्गत फळबाग व वृक्ष लागवडी चे ७५ हेक्टर करिता तांत्रिक व प्रशासकीय मंजूर असून त्याद्वारे मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे.     तालुक्यात कृषी निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास अडचण होऊ नये , निविष्ठाची कमतरता भासू नये या करिता तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांची बैठक तालुका गुण नियंत्रक भरारी पथका सोबत दिनांक-११ मे रोजी घेण्यात आली असे माहिती देताना  तालुका कृषी अधिकारी- कल्याण  शिल्पा निखाडे  यांनी दिली.

 

 


 

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या