डिझायर फाऊंडेशनच्या प्रयत्नाने औषधाची फवारणी
ठाणे
ठाण्यात बऱ्याच ठिकाणी खूप चाळी आहेत. या ठिकाणी कोविड चे बरेच पेशंट सापडतात. पण त्या ठिकाणी वेळेवर निर्जंतुकीकरण होत नाही. काही नागरिकांनी डिझायर फाऊंडेशनच्या प्रज्ञामॅडम यांना संपर्क करून आपली समस्या सांगितली. तेव्हा प्रज्ञामॅडमनी स्वतः उभं राहून ज्या ठिकाणी कोविडचे पेशंट सापडले होते त्याठिकाणी औषधाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करून घेतले. ज्या ठिकाणी फवारणी केली तिथल्या नागरिकांनी प्रज्ञामॅडमचे आभार व्यक्त केले. यावेळी किरणमॅडम, राधा वाघमारे, मनमीत शर्मा आदी संस्थेचे कार्यकर्ते सहभागी होते.
प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी तसेच आपल्या शेजाऱ्यांची पण काळजी घ्यावी. महानगरपालिका निवेदन करण्यात येते की प्रत्येक ठिकाणी कोविडची तपासणी केली पाहिजे.चाळ आणि झोपडपट्टी याठिकाणी वेळोवेळी औषधांची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात यावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले.
निवेदन...... - JANATA xPRESS - https://prajasattakjanata.page/article/nivedan-/Y03_k2.html
0 टिप्पण्या