Trending

6/recent/ticker-posts

कोरोनाची भीती दाखवुन अॅडमिट करून घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

कोरोनाची भीती दाखवुन अॅडमिट करून घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई


ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या खाजगी रुग्णालयांना १६ लाख रुपये दंड


ठाणेकोरोना काळात अव्वाच्या सव्वा बील आकारण्यासह नाहक भीती दाखवुन रुग्णांना दाखल केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेने ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या दोन खाजगी रुग्णालयांना तब्बल १६ लाख रुपये दंड आकारला आहे.  कोणताही आजार नसताना ठाण्यातील ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या दोन रुग्णालयांनी अनेकांना दाखल करुन त्यांच्याकडून लाखोंची बीले आकारली होती. याबाबत तक्रारी आल्यावर ठाणे महापालिकेने चौकशी करुन ही कारवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या या रुग्णालया विरोधात तक्रारी आल्या होत्या. त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. दरम्यान या आधी कोरोना टेस्ट करणाऱ्या थायरोकेअर नामक खाजगी लॅबवरही पालिकेने कारवाई केली होती


 एखाद्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नसतील किंवा रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसेल तर त्यांना कोवीड काळजी केंद्र किंवा घरीच उपचार करणे अपेक्षित आहे. अशा रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले तर आवश्यक असलेल्या रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळेच राज्य शासनाकडूनही तशाप्रकारच्या सुचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही या रुग्णालयांनी कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या आणि त्रासही जाणवत नसलेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले होते. महापालिका प्रशासनाकडून रोजच्या रोज शहरातील रुग्णालयातील शिल्लक जागांचा आढावा घेतला जात असून या आढाव्यादरम्यान ही बाब समोर आली.


त्यानुसार या दोन्ही खाजगी रुग्णालयांना महापालिका प्रशासनाने चार दिवसांपूर्वी नोटीस पाठविली होती. मात्र, दोन्ही रुग्णालयांकडून नोटीसला स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे या नोटीसचा कालावधी संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने दोन्ही रुग्णालयांना मिळून १६ लाखांचा दंड आकारण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीची नोटीस बजावली. यामध्ये तीन रु ग्णांना सात दिवस दाखल करून ठेवल्याप्रकरणी एका रुग्णालयाला तीन लाख तर १३ रुग्णांना ७ दिवस रुग्णालयात दाखल करून ठेवल्याप्रकरणी १३ लाख रुपयांचा दंड आकरण्यात असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त विश्वानाथ केळकर यांनी दिली. सात दिवसांच्या मुदतीत हा दंड भरला नाहीतर मालमत्ता कर वसुली नियमाप्रमाणेच या दंडाच्या रक्कमेची वसुली करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार वेळ प्रसंगी संबधीत रुग्णालयांची मालमत्ताही जप्त होऊ शकणार आहे. दुसरीकडे असे प्रकार टाळण्यासाठी महापलिकेने चार जणांचे एक पथक तयार केले असून या पथकाचे माध्यमातून शहरातील या रुग्णालयांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अशा त्रुटी किंवा चुका आढळल्यातर इतर रुग्णालयांवर देखील कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेने दिला आहे.


 


Post a Comment

0 Comments