सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता
वसई
वसई विरार महापालिकेवर आयुक्त गंगाथरन डी यांची प्रशासक म्हणून राज्य शासनाने निवडणूक पुढे ढकलल्याने नेमणूक केली असल्याने पालिकेच्या इतिहासात निवडणुकी पूर्वीचा काळ सत्ताधाऱ्याशिवाय प्रशासकाच्या हातात असणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला बऱ्यापैकी बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे तर विरोधकांमध्ये मात्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
नवनियुक्त आयुक्त गंगाथरन देवराजन यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश २९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने काढले होते, लॉकडाऊनमुळे महापालिकेची निवडणूक स्थगित केल्याने राज्य सरकारचा निर्णय झाला होता. यामुळे २८ जूनच्या मध्यरात्रीपासून वसई विरार शहर महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून विद्यमान आयुक्त सांभाळणार आहेत. ८ एप्रिलला आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारलेले गंगाथरन देवराजन प्रशासकपदी नियुक्त झाल्याने आता २८ जून पासून आयुक्त व प्रशासक अशा दुहेरी भूमिकेत पालिका प्रशासनाचा कारभार पुढे हाताळणार आहेत
वसई विरार महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाल २८ जून रविवारी संपत आहे. मागोवा घेतला तर १६ मार्चला अर्थसंकल्पाची सभा झाल्यानंतर कोरोना संक्रमण व केंद्र आणि राज्य सरकारच्या टाळेबंदीमुळे महापालिकेची एकही सभा झाली नाही, त्यातच पालिकेमध्ये नव्याने आलेले आयुक्त गंगाधरन डी यांनी प्रत्यक्षात कारभार हाती घेतल्यानंतर लोकप्रतिनिधींना न विचारता निर्णय घेण्यास सुरुवात केली. हा सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का होता.
0 टिप्पण्या