धारावीतील गरजू कुटुंबांना पुन्हा एकदा अन्नधान्याचे वाटप
मुंबई
लॉकडाऊनचा काळ अजून संपलेला नाही. कोरोनाचा प्रभाव अद्यापही ओसरलेला नाही. परिणामी धारावी भागातील परिस्थितीत अद्याप काही सुधारणा झालेली नाही. कित्येकांचे रोजगार बंद झालेत. छोटे मोठे व्यवसाय बंद झालेत. कमवण्याचे साधन नसल्याने परिस्थिती पुर्वीपेक्षा अधिक गंभीर होत आहे. त्यातच आता मुलांच्या शाळां सुरु होणार असल्याने त्यांच्या खर्चाचा भार. अशा संकटात सापडलेल्या गरजु कुटुंबांची यादी मोठी आहे. मात्र त्यातही सुमारे 300 कुटुंबांची परिस्थिती अत्यंत गंभीर आणि बिकट आहे. आजही जेवणाची समस्या या कुटुंबाना भेडसावत आहे. अशा लोकांना पुन्हा एकदा मदतीची अत्यंत गरज असल्याची विनंती ओएनजीसीच्या जागेशकुमार सोमकुंवर यांना प्रज्ञा प्रतिष्ठानने पत्राद्वारे केली. त्यांनीही तातडीने सुमारे १५० कुटुंबासाठी अन्नधान्याची व्यवस्था केली. या अन्नधान्याचे वाटप आज २४ जुन रोजी प्रज्ञा प्रतिष्ठानच्या कार्यालयातून करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भावाच्या संकटाने देशातील सर्वच गोरगरीब जनतेची परिस्थिती अगदी बिकट केली. अचानक संपुर्ण देश लॉकडाऊन झाल्याने गोरगरीब कामगार वर्ग, रोजंदारीवर काम करणारा मजूर सगळे घरातच कैद झाले. त्यांची उपासमारी होऊ लागली होती. आर्थिक चणचण भासल्यामुळे अन्न पाणी मिळेनासे झाले. अशावेळी धारावीसारख्या सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या परिसरात, ऑल इंडिया एससी व एसटी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन, ओएनजीसीच्या माध्यमातून मागील तीन महिन्यापासून सातत्याने मदत करण्यात येत आहे. मुबंई शाखेतील कर्मचाऱयांच्या मदतीने मार्च महिन्यापासुन ते में महिन्याच्या काळावधीत धारावीतील गोरगरीब मजदूर सर्वसामान्य गरजु वर्गातील हजारो लोकाना अन्नधान्य तसेच 10 ते 15 हजार गरजु भुकेल्यांना मोफत चांगल्या प्रतीचे जेवण संस्थेच्या माध्यमातून पुरवण्यात आले.
प्रज्ञा प्रतिष्ठान संस्थेचे कार्यकर्ते आणि हितचिंतक
0 टिप्पण्या