पडाळकर यांना काळे फासू - आनंद परांजपे यांचा इशारा

पवारांवर आक्षेपार्ह टीका करणार्‍या गोपीचंद पडाळकरांचे छायाचित्र  जाळले


ठाणे


शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, बहुजन समाजातील लोकांवर शरद पवारांनी अन्याय केला, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणारे आ. गोपीचद पडाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.  त्याची पहिली प्रतिक्रिया ठाणे शहरात उमटली. शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि कार्यकर्त्यांनी पडाळकर यांच्या छायाचित्राला  जोडे मारुन ते जाळले. यावेळी पडाळकर यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.   
  
शरद पवार यांची देशामध्ये जाणता राजा अशी ओळख आहे. बहुजन समाजातून नेतृत्व घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दलित, आदिवासी, भटके-विमुक्त समाजातील अनेक कार्यकर्त्यांना घडविण्यात आणि त्यांना संविधानिक पदांवर विराजमान करण्यात; मंत्रीपद देण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे स्वार्थासाठी वारंवार बेडूकउड्या मारणार्‍या पडळकर यांच्यासारख्यांना शरद पवार यांचे महत्व आणि कतृत्व समजणारच नाही. आपल्या नेत्यांना खुष करण्यासाठी त्यांनी ही टीका केली आहे. ही टीका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहन करणार नाहीत. त्यांनी या विधानाबाबत तत्काळ माफी मागीतली नाही तर आम्ही पडाळकर यांना काळे फासू तसेच पडाळकर यांना ठाण्यात पाय ठेऊन देणार नाही, असा इशाराही परांजपे यांनी दिला.  
यावेळी ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, वॉर्ड अध्यक्ष सुभाष आंग्रे यांच्यासह अनेक कार्यकते उपस्थित होते. 


  

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या