Top Post Ad

या सुविधा वापरण्याची वेळ कोणावरही येवू नये अशी प्रार्थना मी करतो- मुख्यमंत्री

ठाणे कोव्हीड हॅास्पीटलचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई लोकार्पण
1024 बेडसचे अद्ययावत रूग्णालय आजपासून ठाणेकरांच्या सेवेत दाखल
कोरोनाच्या विरूद्ध लढण्यासाठी आपण सिद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोरोनाविरूद्धची लढाई कठोरपणे लढण्याची ना. एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन


ठाणे


महाराष्ट्र ही लढवय्यांची भूमी आहे. त्यामुळे आम्ही कोरोनामुळे डगमगून गेलेलो नाही. खचलेलो नाही. तर लढण्यासाठी सज्ज आहोत अशी ग्वाही दिली. आपण कोरोना कव्हीडचा सामना करण्यासाठी युद्ध पातळीवर सुविधा निर्माण करण्यात येत असून आज प्रत्येक जण एक टीम म्हणून काम करीत आहोत ही अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी केले. ते कोरोना रुग्णालयांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आपण संपूर्ण महाराष्ट्रात युद्ध पातळीवर मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करीत असून या सुविधा वापरण्याची वेळ कोणावरही येवू नये अशी प्रार्थना मी करतो असे भावपूर्ण उद्गारही मुख्यमंत्री यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने काढले.



कोरोना कोव्हीड-19 महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा तसेच कोव्हीड बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करता यावे यासाठी एमएमआऱडीएच्यावतीने बीकेसी मैदानावर उभारण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड रूग्णालयाचा हस्तांतरण सोहळा तसेच बाळकुम-साकेत येथे १०२४ बेडसचे तळ अधिक १० मजल्यांचे सर्व सुविधांनीयुक्त ठाणे कोव्हीड रुग्णालयाचे ई लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते, राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री ना. एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या उपस्थितीत आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली


आपल्या भाषणात मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाची सुरूवातीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये खूप फरक आहे असे सांगून सुरूवातील आपल्याकडे केवळ दोनच लॅब होत्या आज आपल्याकडे 100 लॅबस निर्माण करण्यात आल्या आहेत. काही लाखांत बेडस तयार करण्यात आले आहेत. मैदानावरील रूग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्याची किमया महाराष्ट्रानेच केली असे सांगून मुख्यमंत्री ना. ठाकरे यांनी आता यापुढे करोनाच्या मागे हात धुवून लागायचे आहे.


     प्रारंभी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी बीकेसी मैदानामध्ये उभा करण्यात आलेल्या कोव्हीड रूग्णालयाविषयी माहिती दिली. तसेच ठाणे कोव्हीड रूग्णालयासाठीही मदत केल्याचे सांगितले. त्यानंतर ठाणे कोव्हीड रूग्णालयाविषयी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी थोडक्यात माहिती दिल्यानंतर रूग्णालयाची चित्रफीत दाखविण्यात आली.  साकेत बाळकूम येथे संपन्न झालेल्या या समारंभाला खासदार सर्वश्री राजन विचारे, डॅा. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, आमदार मंगलप्रभात लोढा, उपमहापौर सौ. पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, महापालिका आयुक्त विजय सिंघल, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती अमर पाटील, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्षा सौ. पदमा भगत, विशेष अधिकारी कोव्हीड-19 रंजीत कुमार, डॅा. पंकज आशिया, स्थानिक नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर, सौ. उषा भोईर, भूषण भोईर, रमाकांत मढवी, दिपक वेतकर, नगरसेविका सौ. निशा पाटील, अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे, एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष अजय आशर, जितू मेहता, राजू वोरा, मनिष खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.  यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, डॅा. तात्याराव लहाने हेही सहभागी झाले होते.


या समारंभात बोलताना राज्याचे नगर विकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी 24 दिवसांच्या विक्रमी वेळेत सर्व सुविधांनीयुक्त कोव्हीड रूग्णालय उभा करण्यात आले असून यासाठी अनेक विकासकांनी यामध्ये आपले योगदान दिले आहे. महापालिकेच्या तिजोरीतून एकही पैसा खर्च न करता हे सुसज्ज असे रूग्णालय उभे करण्यासाठी मदत केल्याबदंदल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. तसेच विविध महापालिका, एमएमआरडीए, एमएमआरसी, सिडको यांच्या माध्यमातून नगर विकास विभाग कोरोना विरोधातील लढाईत महत्वाचे योगदान देत आहे. त्यामुळे या खात्याचा मंत्री म्हणून या गोष्टींचा मला अभिमान आहे असे सांगितले. गेले तीन महिने आपण कोरोनाविरूद्धची लढाई लढत असून या लढाईमध्ये आपण सर्वचजण जीवाची पर्वा न करता लढत आहेत. ही मेहनत वाया जाऊ द्यायची नसेल तर आपल्याला कठोर मेहनत करावी लागणार आहे असे ना.शिंदे यांनी सांगितले.


  


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com