Trending

6/recent/ticker-posts

उपचारा अभावी रुग्णालयासमोरच दोन जणांचा मृत्यू

उपचारा अभावी रुग्णालयासमोरच दोन जणांचा मृत्यू


कल्याण


खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दावा केला आहे की, कोरोना विरोधातील लढय़ासाठी महापालिकासह सर्व यंत्रणा सज्ज आहे. कुठेही कमतरता नाही. तरीही कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारावर पोहचली आहे. तसेच एका दिवसात दोन जणांचा उपचारा अभावी रुग्णालयासमोरच  मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाला उपचासाठी बेड मिळाला नाही. तर दुस:याला ऑक्सीजन व व्हेटिंलेटर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. दोन जणांचा दुदैवी मृत्यूनंतर संपूर्ण शहरात भितीचे वातावरण आहे. 


 एकाचे नाव अशोक पूर्ववंशी. अशोक यांची प्रकृती चार दिवसापासून बिघडली होती. त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यांना शुक्रवारी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना कल्याणच्या कोविड होलीक्रास रुग्णालयात मध्ये घेऊन गेले. त्यांचा रिपोर्ट प्राप्त नसल्याने रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यांना घेऊन रुक्मीणी बाई रुग्णालयात घेऊन आले. त्याठिकाणी ऑक्सीजनची व्यवस्था नसल्याने अशोक यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना कल्याण पूर्वेतील आहे. रोहित डोळस याच्या वडिलांना श्वास घेण्यास त्रास  होत असल्याने त्यांचे नातेवाईकांनी रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले. त्याठिकाणी ऑक्सीजन सुविधा नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेत मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बेडसाठी धावपळ केली. केडीएमसी व खाजगी रुग्णालयात मदत मिळाली नाही.Post a Comment

0 Comments