Top Post Ad

सुरक्षा किटच्या अभावाने स्मशानभूमीतील कामगारांनाच कोरोनाची लागण

स्मशानभूमीतील पालिकेच्या कामगारांनाच कोरोनाची लाग


स्मशानभुमीतील कंत्राटी कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर



ठाणे


ठाणे महानगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे स्मशानभूमीत जोखमीचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वारंवार मागणी करूनही याकडे ठामपा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ठाणे जिल्हा इंट्कच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे स्मशानभूमीतील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकेच नव्हे तर ज्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे,त्यांचा पगार कापण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून केला जात आहे. असे न करता सर्वच कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत देण्यात यावा,कोणाचाही पगार कापला जाऊ नये,रुग्णालयात जेवढे दिवस तो दाखल असेल तेवढ्या दिवसाचा पगारही त्याला देण्यात यावा. तसेच शहरातील प्रत्येक स्मशानभूमीमधील अशा जोखमीचे काम करणाऱ्या  कर्मचारीवर्गाची तत्काळ कोरोना चाचणी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.


ठाण्यात आतापर्यंत जे कोरोनाने मृत पावले आहेत,त्यातील 80 टक्के रुग्णांचे अंत्यसंस्कार याच ठिकाणी केले आहेत.त्यामुळे येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाच या कोरोनाबाधीत रुग्णांचे अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.त्यातूनच आता येथील एका चालकाला आणि कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. कर्मचाऱ्याला त्रास होत असल्याने त्याने दोन दिवसापूर्वी काहिनी कोरोनाची चाचणी केली.त्यात त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, परंतु या सुरक्षा रक्षकांना अद्याप तुटपुंज्या साहित्यावरच भागवून घ्यावे लागत आहे.त्यांना जे किट देण्यात आले आहेत,त्यांचे आयुर्मान कमी आहे. ते फाटत आहेत, हॅन्डग्लोजही फाटत आहेत.त्यांना सॅनिटायझर,साबण पुरविले जात असले तरी ते त्यांच्यापर्यंत पोहचतेच असे नाही, अशी व्यथा कर्मचारी मांडत आहेत.


विशेष म्हणजे आता शहरातील प्रत्येक स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांची दर 15 दिवसांनी बदली केली जात आहे. परंतु त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात.एखाद्याला बाधा झाली असेल आणि ते त्याच्या लक्षात आले नसेल आणि त्याची बदली झाली व तो इतरांच्या संपर्कात आला तर कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणात होऊ शकतो हे देखील तितकेच सत्य आहे.त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करुन स्मशानभूमीत जेवढे कर्मचारी काम करतात,त्यांची महापालिकेच्या वतीने तत्काळ मोफत कोरोना चाचणी करावी,तसेच त्यांना चांगल्या दर्जाचे हॅन्डग्लोज,मास्क,कीट व इतर अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करुन द्यावे,


जवाहरबाग स्मशानभूमीत कर्मचाऱ्याना दिलेल्या किटचा एका बाजूला ढिगारा पडलेला आहे.मागील दीड महिन्यापासून हा ढिगारा तसाच आहे,तो अद्याप उचलला गेलेला नाही. त्यात आता पाऊस सुरु होत आहे, त्यामुळे यातून आणखी एखाद्याला बाधा झाली तर त्याला जबाबदार कोण?  त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप ठाणे जिल्हा इंटक कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा शहर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे कवच द्यावे,अशी मागणीही त्यांनी पालिका आयुक्त विजय सिंघल यांना केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com