नवी मुंबई महानगरपालिकेचा कार्यभार अभिजित बांगर यांच्याकडे
तर ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी डॉ.बिपीन शर्मा
मुबई
ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली करण्यात आली आहे. त्या पदावर डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातले पत्र पाठवले आहे. डॉ. विपीन शर्मा हे विदेशी प्रशिक्षणासाठी गेले आहेत. तिथून आल्यानंतर त्यांनी तातडीने ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारावा असं कुंटे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. मार्च २०२० ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली होती. ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अतिरिक्त आयुक्तांकडे पदभार देऊन सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संजीव जयस्वाल यांच्या जागी विजय सिंघल यांच्याकडे आयुक्तपद देण्यात आले होते. पाच वर्षांनी ठाणे महापालिकेला नवे आयुक्त मिळाले होते. मात्र आता त्यांची बदली करण्यात आली आहे...!
आयएएस अधिकारी डॉ. राज दयानिधी यांची उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त म्हणून तर डॉ. विजय राठोड यांची मीरा भाईंदर मनपाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच आज 23 जून रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी युवा आयएएस अधिकारी अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली आहे.
अभिजित बांगर हे मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील असून अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य बार्शी येथे होते. त्यांनी पुणे येथे अर्थशास्त्र या विषयात एम. ए. केले आहे काही काळ तेथील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आहे. बांगर २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी नागपूर येथे जिल्हा सहायक अधिकारी, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. त्याचप्रमाणे, त्यांनी रायगड सातारा येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रत्येकी दोन वर्षे काम केले आहे. पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट २०१४ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला तिथे वर्षे महिने काम केले आहे. नागपुरात २००९ मध्ये परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांची स्वतंत्रपणे पहिली नेमणूक रायगड जिल्हयातील माणगावचे अतिरीक्त जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर रायगड जिल्हापरिषद, अलीबाग येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले.अलीबागनंतर त्यांची बदली सातारा जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. नागपूर महानगरपालिकेत त्यांनी अनेक विधायक उपक्रमांना गतीमान केले आहे.
0 टिप्पण्या