रुक्मिणी रुग्णालयात बेड व व्हेंटिलेटर वाढविण्याची ब.वं.आ.ची मागणी

कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात अपुऱ्या सुविधांबाबत अधिकाऱ्यांना धरले धारेवर


 कल्याण


अपुऱ्या सुविधांमुळे कल्याणच्या रुक्मिणी रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला होता. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून रुक्मिणी रुग्णालयात वेंटिलेटर व बेडची संख्या वाढवावी, खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वाढ तयार करण्यात यावा, टेस्ट लॅबची संख्या वाढविण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे विभागाच्यावतीने कल्याण-डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.


  कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आरोग्याच्या गैरसोयींमुळे सामान्य व्यक्तींचे अतोनात हाल होत आहे. कल्याणच्या रुक्मिणी रूग्णालयात व्हेंटिलेटर व बेड उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रुक्मिणी रुग्णालयात बेड व व्हेंटिलेटर वाढविण्यात यावे, खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वार्ड तयार करावा. कोविडच्या टेस्टसाठी लॅब वाढवाव्यात.  पालिका रुग्णालयात कर्मचारी व  रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्यात यावी. या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे महिला जिल्हाध्यक्ष माया कांबळे, नितीन वानखेडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हुंबरे यांच्यावतीने कल्याण-डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA