Trending

6/recent/ticker-posts

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २५ जुन रोजी बीआरएसपीचे मूक प्रदर्शन

२५ जुन रोजी बीआरएसपीचे मूक प्रदर्शन



ठाणे
 दलितांवरील हल्ले-अत्याचार व तरुणांच्या हत्या यांच्या विरोधात निषेधार्थ  आणि सर्व सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाच लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने मूक प्रदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे. २५ जुन रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु राहिल. तरी सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.  


२०२० कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिकदृष्टया उध्वस्त गरजू परिवारास केंद्र सरकारने पंतप्रधान केअर फंडातून अथवा विशेष पॅकेज अंतर्गत आगामी सलग दर तीन महिने पाच हजाराचे अर्थसहाय्य करावे. केंद्र सरकारने देशातील सर्व माजी आमदार /खासदार यांना क्रेमीलियरचे धोरण लावून एक कोटी पेक्षा जास्त संपत्तीधारक माजी आमदार खाजदारांची पेन्शन योजना त्वरित बंद करून तो निधी कोनोना वैद्यकीय सेवेसाठी वापरण्यात यावा. महाराष्ट्रातील समाजकल्याण व आदिवासीकल्याण मंत्रालयात विविध योजनांची प्रभावी व संपूर्ण निधीचा सदुपयोग करून कोरोना महामारीत दलित-आदिवासी कुटुंबाना आर्थिक सक्षमता प्रदान केली पाहिजे. गोरगरीब पालकांच्या विध्यार्थ्यांना शालेय फी अभावी शाळेत त्रास होऊ नये त्याकरिता शिक्षण संस्थानी अशा विद्यार्थ्यांना फी सवलत देऊन पुरेसा वेळ दयावा, यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने तसे आदेश काढावेत. अशा मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे चंद्रभान आझाद यांनी केले आहे.


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या