Top Post Ad

विवा फाउंडेशनच्या वतीने गावकऱ्यांना साडी व टी-शर्टचे वाटप

गोरगरीब माता-भगिनींच्या अब्रू रक्षणासाठी विक्रांत वार्डे यांचा स्तुत्य उपक्रम



अलिबाग (प्रवीण रा. रसाळ) :


निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानात गोरगरीब जनतेला रोटी, कपडा, मकान या मूलभूत गरजांची भ्रांत पडली असताना माता-भगिनींच्या अब्रू रक्षणासाठी विवा फाउंडेशनचे विक्रांत वार्डे तत्परतेने पुढे आले व त्यांच्या फाउंडेशन तर्फे उमटे गावातील वाडीत भगिनींना साडी व बंधूंना टी-शर्टचे वाटप करण्यात आले सदर वाटप युवा कार्यकर्ते निनाद रसाळ, साहिल भगत, प्रीतम भगत, बोरघर ग्रामपंचायत सदस्य जनार्दन भगत, विवा फाउंडेशन रायगड उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, पेझारी शाखाध्यक्ष प्रमोद पाटील, पेझारी शाखा उपाध्यक्ष सुभाष इंदुलकर, सचिव मुकेश नाईक, बोरघर ग्रामपंचायतचे सरपंच अरुण भगत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


"विवा फाउंडेशन" सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक संवैधानिक मदत कार्यास नेहमीच आघाडीवर राहणारी संस्था म्हणून प्रसिध्द आहे. विवा शब्दाचा शाश्वत अर्थ "चिरायू होवो" असा असल्याने विवा फाउंडेशन ही केवळ एक संस्था नसून समाजासाठी समाजाने सुरू केलेली चळवळ आहे जी यापुढे ही अनेक उपक्रमात पुढे येऊन मदत करत राहील अशी माहिती संस्थेचे सर्वेसर्वा विक्रांत वार्डे यांनी दिली. तसेच उमटे वाडीत करण्यात आलेल्या कपडे वाटप मदतकार्याची प्रेरणा त्यांना बोरघर ग्रामपंचायतचे सरपंच अरुणजी भगत यांच्या मार्गदर्शनाने मिळाल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीना सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com