हात-पाय मोडलेल्या महिलांना वं.ब.आ.ची तातडीची मदत

उपचारास डॉक्टरांचा नकार, वंचितचे स्वखर्चाने केली मदतपरभणी


हात व पाय मोडलेल्या अवस्थेत डॉक्टरांची मदत मागणाऱ्या दोन महिलांना कोणीही मदत करीत नाही. या महिला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदतीची याचना करतात पण कोणीही त्यांना मदत करायला पुढे येत नाही. अश्यातच वंचितच्या कार्यकर्त्यांना याबाबत फोन येतो. माहिती मिळते आणि काही मिनिटातच कार्यकर्ते हॉस्पिटल मध्ये धाव घेऊन या महिलांना सर्वोतोपरी मदत करतात. हा सर्व प्रकार परभणी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घडला असून अनेकांनी माणुसकी सोडली असली तरी वंचितच्या कार्यकर्त्यानी केवळ एका फोनवर रुग्णालयात येऊन मदत केली. यामुळे परिसरातील अनेकांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि धन्यवाद दिले.


            वंचित बहुजन आघाडी भटके विमुक्तचे राज्य समन्वयक डॉ. धर्मराज चव्हाण यांना माहिती  मिळाली की दोन महिलांना डॉक्टरची मदत हवी आहे, एका महिलेचा पाय तर दुसऱ्या महिलेचा हात मोडला असून या दोन्ही महिलांना कोणीही मदत  करायला तयार नाही. टाकळी येथील मातंग समाजाची महिला हात मोडलेल्या अवस्थेत रुग्णालयाबाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदत मागते डॉक्टरही तिला मदत करीत नाही.  तोपर्यंत वंचितचे कार्यकर्ते धर्मराज चव्हाण  सिद्धार्थ कांबळे, संपत नंद, अरुण गिरी, अशोक चंद्र मोरे, बी. आर. आव्हाड हे रुग्णालयात येतात त्या महिलेला कोरोना आहे की नाही याची काळजी न करता संबंधीत महिलेला रुग्णालयात दाखल करून तिच्या उपचाराचा सर्व खर्च स्वतः करतात. दुसऱ्या महिलेचा पाय मोडल्याने तिलाही मदत करून सर्व खर्च वंचितचे कार्यकर्ते करतात. दुसऱ्या दिवशी डॉ. धर्मराज चव्हाण व कार्यकर्त्यानी रुग्णालयात दोन्ही महिलांना भेट देऊन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. शिवाय त्यांना आर्थिक मदतही केली. ही मदत तुम्हाला बाळासाहेबच्या वंचित बहुजन आघाडीने केली आहे,असे सांगितल्यावर त्या महिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad