Top Post Ad

सत्तेची भूक शमविण्यासाठी आंदोलनाचा किळसवाणा प्रयत्न फसला - डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री

आपली राजकीय पोळी शेकून सत्तेची राक्षसी भूक शमविण्यासाठी


भाजपचा आंदोलनाचा किळसवाणा प्रयत्न फसला - डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री


नागपूरएकीकडे कोरोनाच्या महामारीत महाविकास आघाडी सरकार या संकटासमोर खंबीरपणे लढा देत असताना राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात येत आहे. सत्तेसाठी हपापलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा यांची नवी खेळी कोरोना संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला अडचणीत आणून राष्ट्रपती शासन लागू करून आपली राजकीय पोळी शेकून सत्तेची राक्षसी भूक शमविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आजचे भाजपचे आंदोलन हे देखील त्याचाच भाग असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री व महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.


    या संकटसमयी राजकारण विसरून सरकार सोबत काम करण्याची हिंमत न दाखवता राजकारण करून अस्थिर वातावरण निर्माण करणाऱ्या भाजपला महाराष्ट्रातील जनता या महाराष्ट्र द्रोही भाजपाला कदापि माफ करणार नाही. सरकारविरोधात सतत काही बेत आखून राजभवनच्या अंगणाची वारंवार वारी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचे आपल्या अंगणाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्या अंगणातील गरीब जनता त्रस्त असून महाविकास आघाडी तिथे सर्वोतोपरी  मदत देत आहे. त्यामुळे भविष्यातील आपलं उरलेलं अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी स्वतः च्या अंगणाकडे लक्ष देऊन जनतेची सेवा करावी असा उपरोधक सल्लाही डॉ. नितीन राऊत यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.


भाजपच्या आमदार, खासदार व नेत्यांनी कोरोनाच्या या संकटात राज्य सरकारला मदत न करता पीएम केअरला मदत केली. तसेच मुंबईतील व्यापारी वित्तीय केंद्र बिकेसीतून काढून गुजरातला स्थलांतरीत करण्याचा घाट घातला. त्यावेळीही भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून गुजरातची बाजू घेतली. आत्मनिर्भर पॅकेज हे अनाकलनीय असून प्रत्यक्ष गोर-गरीब-शेतकरी-मजुरांच्या तोंडाला पाने पुसली आहे. पॅकेज नसून इव्हेंट आहे.  त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारकडे केलेली पॅकेजची मागणी कोणत्या आधारावर  केली आहे. ती त्यांनी थेट केंद्राकडे करावी असे देखील डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले.


महाराष्ट्राचे केंद्राकडे असलेले जीएसटीचे पैसे मिळविण्यासाठी व केंद्र सरकारला महाराष्ट्रासाठी ज्यादा पॅकेज मिळवून दिला असता तर महाराष्ट्राच्या जनतेने भाजपचे आभार मानले असते. परंतु अडचणीच्या काळात काळे मास्क व फिती लावून आंदोलन करणाऱ्यांनी स्वतःलाच काळे फासून आपली नाचक्की करून घेतली. त्यांना  मराठी माणूस कधीच माफ करणार नसल्याचे मत डॉ राऊत यांनी व्यक्त केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com