कोवीड पॉझीटीव्ह महिलेची यशस्वी प्रसूती, बाळ आणि आई दोघेही सुखरूप

वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलमधून तान्‍ह्या मुलीला जन्‍म दिलेल्‍या


कोविड-१९ पॉझिटिव्‍ह महिलेला यशस्‍वीरित्‍या उपचारानंतर देण्‍यात आला डिस्‍चार्ज


 नवी मुंबई 


नुकतेच वाशी येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल हिरानंदानी हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यात आलेल्‍या ३५ वर्षीय कोविड-१९ पॉझिटिव्‍ह महिला रूग्‍णाने ८ मे रोजी हॉस्पिटल्‍या सी-सेक्‍शनमध्‍ये एका निरोगी तान्‍ह्या मुलीला जन्‍म दिला.  महिलेला तिच्‍या प्रसूतीकाळाच्‍या ३६व्‍या आठवड्यामध्‍ये संसर्गाची लागण झाली होती. अगदी सावधपणे तिचा उपचार व प्रसूतीचे नियोजन करण्‍यात आले. हॉस्पिटलमध्‍ये भरती केल्‍यानंतर हॉस्पिटलमधील कोविड टास्‍कफोर्स म्‍हणून असलेल्‍या मल्‍टी-डिसीप्‍लीनरी टीमने तिच्‍या केसची काळजीपूर्वक तपासणी केली. रूग्‍णावर प्रोटोकॉल-नुसार कोविड-१९ संदर्भात उपचार करण्‍यात आला. हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षामध्‍ये तिच्‍यावर उपचार करण्‍यात आले आणि काल १४ मे रोजी तिला घरी जाण्‍यासाठी डिस्‍चार्ज देण्‍यात आला.


कोविड-१९ची लागण झालेल्‍या रूग्‍णावर करण्‍यात आलेल्‍या उपचार प्रक्रियेबाबत बोलताना हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसीन विभागाच्‍या डॉ. फराह इंगळे म्‍हणाल्‍या, ''कोविड-१९ पॉझिटिव्‍ह रिपोर्टसह रूग्‍णाला हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यात आले. आरोग्‍य मंत्रालयाच्‍या मार्गदर्शकतत्त्वांनुसार तिच्‍यावर उपचार करण्‍यात आले आणि तिने देखील उपचारांना चांगला प्रतिसाद दिला.'' रूग्‍णाची प्रसूती महत्त्वाची असल्‍यामुळे टीमने स्‍त्रीरोग व प्रसूतीशास्‍त्र विभागाच्‍या डॉ. मंजिरी मेहता आणि बालरोग विभागचे डॉ. कुमार साळवी यांचा सल्‍ला घेतला.


केसच्‍या प्रसूती संबंधित पैलूंबाबत बोलताना स्‍त्रीरोग व प्रसूतीशास्‍त्र विभागाच्‍या डॉ. मंजिरी मेहता म्‍हणाल्‍या, ''३६ आठवड्यामध्‍ये असलेल्‍या रूग्‍णाची प्रसूती तारीख ९ मे होती. आमच्‍या कोविड टास्‍कफोर्सच्‍या मदतीने आम्‍ही तिच्‍या केसची बारकाईने पाहणी केली. आम्‍ही ८ मे रोजी नॉन स्‍ट्रेस टेस्‍ट केली. या टेस्‍टमधून गर्भाच्‍या हृदयाच्‍या ठोक्‍यांबाबत निश्चित समजले नाही (कदाचित ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्‍यामुळे). अल्‍ट्रासाऊंड चाचणी करण्‍यात आली, ज्‍यामधून बाळाच्‍या मानेभोवती गर्भनाळ गुंडाळली असल्‍याचे दिसले. सर्वांच्‍या एकमताने सीझेरियन करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. पालकांना या प्रक्रियेबाबत समुपदेशन करण्‍यात आले आणि संमती मिळाल्‍यानंतर टीमने सिझेरियन प्रक्रिया सुरू केली. रूग्‍णाने एका निरोगी तान्‍ह्या मुलीला जन्‍म दिला, जन्‍माच्‍या वेळी बाळाचे वजन ३ किग्रॅ होते.'' प्रसूतीनंतर माता व बाळ या दोघांचे घशामधील स्‍वॅब्‍स घेण्‍यात आले आणि चाचण्‍यांमधून कोविड-१९ निगेटिव्‍ह असल्‍याचे दिसून आले.


रूग्‍णाच्‍या डिस्‍चार्जदरम्‍यान बोलताना बालरोग विभागाचे डॉ. कुमार साळवी म्‍हणाले, ''प्रसूतीनंतर माता व बाळाला वेगवेगळ्या कक्षांमध्‍ये ठेवण्‍यात आले, ज्‍यामुळे आम्‍ही बारकाईने त्‍यांच्‍यावर देखरेख ठेवू शकलो. कोविड टास्‍कफोर्ससह स्‍त्रीरोग व बालरोग टीमने कुटुंबाला प्रसूतीनंतर घ्‍यावयाची काळजी आणि मार्गदर्शकतत्त्वांनुसार होम क्‍वारंटाइनबाबत सल्‍ला दिला.''  


डिस्‍चार्जदरम्‍यान या तरूण रूग्‍णाचे पती म्‍हणाले, ''मी डॉक्‍टर्स, परिचारिका, हॉस्पिटलमधील कर्मचारी यांचे त्‍यांनी केलेल्‍या सेवेसाठी आभार मानतो. माझी पत्‍नी व बाळाची योग्‍यरित्‍या काळजी घेतली गेली आणि मी त्‍यांच्‍या प्रयत्‍नांचे कौतुक करतो.''


वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलमधील फॅसिलिटी डायरेक्‍टर संदीप गुदूरू म्‍हणाले, ''मला या केसमध्‍ये यशस्‍वीपणे योगदान देणारे कोविड टास्‍कफोर्स आणि स्‍त्रीरोग, बालरोग, अॅने‍स्‍थेसिया विभाग व नॉन-मेडिकल सपोर्ट स्‍टाफचा अभिमान वाटतो. उपचारातून बरे झालेल्‍या रूग्‍णांचे मनापासून अभिनंदन.''  फोर्टिस हेल्थकेअर लिमिडेट विषयी: फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य आरोग्य सेवा पुरवठादार आहे. कंपनीच्या आरोग्य सेवांमध्ये मुख्यत्वे रुग्णालय, डायग्‍नोस्टिक्स आणि डे-केअर स्पेशालिटीच्या सुविधांचा समावेश आहे. सध्या कंपनी ३६ आरोग्य सुविधा (विकसनशील प्रकल्पासह) ९,००० बेड्स आणि ४१५ हून अधिक डायग्‍नोस्टिक्‍स केंद्रांसह भारत, दुबई आणि श्रीलंका या ठिकाणी त्यांची आरोग्य सेवा पुरवत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad