राष्ट्रवादीकडून वासिंद मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वासिंद मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप राष्ट्रवादीचे नेते दिलीप पाटील यांची सामाजिक बांधिलकी


शहापूर


लॉकडाउन मध्ये चौथ्यांदा वाढ झाल्याने गरीब गरजु दुर्बल घटकातील कुटुंबांची परिस्थिती हलाकीची झाली आहे. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची परिस्थिती आजही बेताचीच आहे.त्यात शासनाकडुन कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्यामुळे शेतमजुर, नाका कामगार, कंत्राटी कामगार, घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबात किराणा सामानाची चिंता वाढु लागली आहे.याचा विचार करत आपली एक सामाजिक बांधिलकी जपत वासिंदचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिलीप पाटील यांच्या पुढाकाराने डीएसपी गृपच्या वतीने वासिंद मधिल पुर्व -पश्चिम भागातील गरजु कुटुंबांना किराणा मालाच्या पॅकेटचे वाटप नुकतेच करण्यात आले  जीवनावश्यक वस्तूंमध्ये साखर, कांदे, बटाटे, मसाला ,हळद ,गोडेतेल, तूरडाळ, साबण, लहान मुलांना बिस्कीटे आदी जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले यावेळी  राष्ट्रवादीचे नेते दिलीप पाटील,पंचायत समिती सदस्या संजीवनी कोचुरे, माजी पंचायत समिती उपसभापती गीताताई पाटील, गजानन पाटील, सदस्य वासुदेव काठोळे,माजी ग्रामपंचायत सदस्या दीपाली पाटील, राष्ट्रवादी विभाग अध्यक्ष बळीराम शेलार, अनिल शेलार, संजीव जाधव सर, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील, सुधीर पाटील, सौरभ पाटील, बाळा शेलार, नारायण लोणे, अमोल गोरले, आदी उपस्थित होते .टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad