अहमदाबाद येथील नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाची उपलब्धी

अहमदाबादचे नग्न सत्य ! 


पुरुषोत्तम आवारे


अहमदाबाद येथील प्रत्येकाची चाचणी केल्यास किमान ७० टक्के लोक पॉझिटिव्ह निघतील अशी भीती उच्च न्यायालयात गुजरात सरकारचे महाधिवक्ता कमल त्रिवेदी यांनी लेखी व्यक्त केली आहे . शुक्रवारी सरकारने हे म्हणणे न्यायालयाला सादर केल्याचे सविस्तर वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे . मोदींनी घडवून आणलेल्या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाची ही भयंकर उपलब्धी असल्याचेही उघड झाले आहे .भारतात कोरोनाच्या संक्रमणाची गती आणि बाधितांची संख्या पाहता सगळ्यांसाठी चिंतेची बाब आहे . मुंबईसह देशातील काही प्रमुख शहरात कोरोनाचा कहर म्हणता येईल एवढी स्थिती भयावह बनली आहे . या सोबतीला गुजरात मधील अहमदाबाद हे शहर कोरोनाच्या बाबतीतले सर्वाधिक धोक्याचे शहर बनले आहे . 
या जीवघेण्या साथीचा शिरकाव देशात होण्यासाठी कोण जबाबदार आहे ? कुणाचे नियोजन चुकले ? लोकांना दिलासा देण्यास कुणी कुचराई घडवून आणली ? या प्रश्नांची चर्चा करण्याची ही वेळ नाही असे सत्ताधारी गेली काही महिने लोकांना सांगत आहेत . त्यांचे हे म्हणणे मान्य केले तरी सत्य कधीतरी उघड होतेच . लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळणे सोपे असते मात्र सगळ्याच पातळीवर अशी टाळाटाळ करतां येत नसल्याचे परवा गुजरात उच्च न्यायालयाने सरकारच्या लक्षात आणून दिले . त्याचा परिणाम असा झाला की पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जे लोक आरोप करीत होते त्यांना यामुळे बळ मिळाले आहे .


भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीत केरळ राज्यात आढळून आल्यावर त्याकडे दुर्लक्ष करीत २४ आणि २५ फेब्रुवारीला अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या नमस्ते ट्रम्प या सोहळ्याला किमान लाखभर लोकांना उपस्थित ठेवण्यात आले होते . या सोहळ्यासाठी अमेरिकेतून किमान ६ हजार लोक आले होते . याच काळात देशात उतरणाऱ्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानांची कोविड संदर्भातील कोणतीही चाचणी घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नव्हती . अहमदाबाद येथील प्रत्येकाची चाचणी केल्यास किमान ७० टक्के लोक पॉझिटिव्ह निघतील अशी भीती उच्च न्यायालयात गुजरात सरकारचे महाधिवक्ता कमल त्रिवेदी यांनी लेखी व्यक्त केली आहे . शुक्रवारी सरकारने हे म्हणणे न्यायालयाला सादर केल्याचे सविस्तर वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे . मोदींनी घडवून आणलेल्या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाची ही भयंकर उपलब्धी असल्याचेही उघड झाले आहे .


अहमदाबाद शहराची लोकसंख्या जवळपास ९२ लाख आहे , सत्तर टक्के म्हणजे किमान ६५ लाख लोक सध्या कोरोनाच्या विळख्यात असल्याची कबुली उच्च न्यायालयात सरकारने देणे म्हणजे गुहराज्याची राखरांगोळी करायला निघालेल्या प्रधान सेवकाच्या अजब कर्तृत्वाचा हा गजब नमुना म्हटला पाहिजे . जिथे गृहराज्याची अशी वाट लावली असेल तर विशाल देशाचा हा माणूस कशा पद्धतीने विचार करीत असेल याचा अंदाज आजवर त्यांनी केलेल्या विविध बाष्कळ इव्हेन्टवरून येतो . गुजरात मधील या महत्वाच्या शहरात कोरोनाचा कहर सुरु असताना त्या या शहराची एकही बातमी न देणाऱ्या सगळ्या राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांना मानायलाच हवे . अहमदाबादचे सत्य जगापुढे आल्यास आपली नामुष्की होण्याच्या भीतीने हे सत्य झाकले जात असेल तर असे झाकण्याचे कार्यक्रम आजवर कोण कोणत्या क्षेत्रात केले गेले असावे याचाही अदमास यायला लागतो .


सत्य काही काळासाठी लपवता येते , असे काही घडलेच नसल्याचा आभासही काही काळ निर्माण करता येतो मात्र सदाकाळ सत्य दाबता येत नसल्याचे अहमदाबादच्या घटनेने सिद्ध केले आहे . भाजपच्या लोकांना प्रधानसेवक भलेली देशाला लाभलेला दैवी योद्धा वाटत असला तरी विस्तीर्ण देशाच्या भूभागावरील ते मोठे बुजगावणे ठरले आहे . 
तबलिगी जमातीचा आधार घेऊन मुस्लिमाना टार्गेट करण्याची एक मोठी मोहीमच कोरोना संकटाच्या काळात या लोकांनी चालवली त्याला मोदींच्या संपूर्ण सहकार्यांनी मूकसंमती देऊन देश दुसऱ्या फाळणीच्या उंबरठ्यावर नेवून ठेवल्याचे आपण सगळ्यांनी अनुभवले आहे . डोक्यात विखारापलीकडे काहीही नसले की जुन्या धोरणांना नवी नावे देत लोकांना भूल देऊन आणखी एखादी टर्म मिळविता येणे या विशाल देशात अशक्य नाही आणि दीर्घकाळ लोकांना बनविणे शक्य नाही हेच अहमदाबादच्या घटनेने जगाला दाखवून दिले आहे . टाईम्स ऑफ इंडिया च्या इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद


-पुरुषोत्तम आवारे


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


अहमदाबाद लोकसंख्या :-  55 लाख,  मुंबई लोकसंख्या :-  2 कोटी   (अहमदाबाद पेक्षा चौपट)


अहमदाबाद क्षेत्रफळ :- 8086 चौरस किलोमीटर, 


मुंबईचे क्षेत्रफळ :- फक्त 603 चौरस किलोमीटर (अहमदाबाद पेक्षा 13 पटीने कमी)


अहमदाबाद लोकसंख्येची घनता :- फक्त 680 प्रति चौरस किमी
मुंबई लोकसंख्येची घनता :-  34 हजार प्रति चौरस किलोमीटर
म्हणजे मुंबईची लोकसंख्येची घनता अहमदाबाद पेक्षा  50 पटीने जास्त आहे
(लोकसंख्येची घनता म्हणजे 1किमी ×1किमी च्या चौरस क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची सरासरी संख्या)


अहमदाबाद कोरोनाग्रस्त रुग्ण :-  10 हजार
मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्ण :- 30 हजार (तिप्पट)


अहमदाबाद कोरोनामुले होणारा मृत्युदर :- 6.7
मुंबई कोरोनामुळे होणारा मृत्युदर :- 3.8   (अहमदाबाद पेक्षा निम्मा)


मुंबईमध्ये 1 किलोमीटरच्या परिसरात सरासरी 34 हजार लोक राहतात आणि अहमदाबाद मध्ये 1 किलोमीटर परिसरात सरासरी फक्त 680 लोक राहतात. मुंबईत देशविदेशातून रोज लाखो लोक येतात, त्यामानाने अहमदाबादला कोणी ढुंकून देखील बघत नाही. लोकसंख्या, क्षेत्रफळ, लोकसंख्येची घनता यात या दोन शहरात इतकी प्रचंड तफावत असताना अहमदाबादची परिस्थिती मुंबईपेक्षा देखील इतकी भयानक होण्यामागचे नेमके कारण काय? 


तुम्हाला नसेल उत्तर सापडत तर..... आठवा.
दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता आणि त्यानंतर 24 दिवसांनी भक्तांचे परवरदिगार, विष्णूचे अकरावे अवतार, लोकांच्या गराड्यात राहून स्वतःचा उदो उदो करून घेण्याची प्रचंड लालसा असणारे व्यक्तिमत्व, स्वस्तुतीत तल्लीन होऊन ब्रम्हानंदी टाळी मारणारे देशाचे पंतप्रधान नरो मे इंद्र साहेबांनी दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी जवळपास सव्वा लाख लोकांना अहमदाबाद येथील जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये जमवून 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम साजरा केला होता. 


अडाणी नेत्याचे अडाणी भक्त बौद्धिक पोस्टवर सहसा येत नाहीत. ते चिल्लरबाजीत रममाण असतात पण जरी एखाद्या दीड शहाण्या भक्ताला कंड सुटलाच तर  10 वी ला गणित आणि भूगोल विषयात पहिल्या प्रयत्नात किमान पास झालेल्या भक्तांनीच यावर वाद घालण्याची चेष्टा करावी.
आणि हो...  बोर्ड सर्टिफिकेट मोदींच्या डिग्रीप्रमाणे खरे असणे बंधनकारक..


विक्रम प्रतापसिंग रजपूत


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1